शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):-
मा. खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उमंग फौंडेशन च्या वतीने रक्त शुद्धी करण हिजमा कॅम्प ठेवण्यात आले होते. त्या निमित्ताने शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते गफ्फारखान रहेमानखन पठाण यांनी भेट दिली.
त्या वेळी हिजमा करणाऱ्या बांधवाना निरोगी आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. व उमंग फौंडेशन च्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालकांना अशीच समाज सेवा घडो व भावी कार्या साठी गफ्फारभाई च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांचा उमंग फौंडेशन वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित सचिन चौगुले, सुरेश आरणे. समीर शेख,ढमढेरे सर,अनिस पठाण.अल्ताफ पठाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

