लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने एक लाख वृक्षारोपण, संवर्धन मोहीम राबविण्यात येत आहेत या अनुषंगानेच आज दिनांक.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय महासचिव स्वाभिमानी चर्मकार महासंघ, ननवरे फुटवेअर चे मालक श्री. गोरख शेठ ननवरे यांनी सदिच्छ भेट देत बोलताना म्हणाले.
ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ही संस्था वृक्ष संवर्धन साठी खुप मोठे कार्य करत आहे. सर्व झाडांची निगा ग्रीन फाऊंडेशन चे सभासद योग्य काळजी घेताना दिसत आहेत. गेल्या दोन दिवसापुर्वी स्वतः संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप यांनी झाडांना औषध फवारणी तसेच ग्रीन फाउंडेशन सभासद दर आठवड्यात दोनदा झाडांना पाणी घालण्याचे कार्य करत आहेत.
ग्रीन फाउंडेशन ने सर्वाना दाखवून दिले आहे आहे की नुसती झाडे न लावता त्याचे संगोपन कसे करावे . खरच ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्था खुप छान कार्य करत आहे पुढील काळात ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य शक्य होईल तेवढी मदत करणार असल्याचे गोरख ननवरे यांनी सांगितले तसेच वाढदिवसानिमित्त निसर्गाच्या सान्निध्यात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करावेत असे वक्तव्य ननवरे यांनी केले. या वेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, गोरख ननवरे, गौरव काळभोर, गणेश काळभोर, शंतनू धुमाळ,मनोज काळभोर, बाबासाहेब यादव उपस्थित होते.

