shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ह भ प गोपाळ महाराज गुढे यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन..

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन ) 

शिर्डी येथील वै. ह. भ. प. गोपाळ महाराज गुढे वय 92 वर्ष शिरडी येथे सोमवारी सायंकाळी  वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांना गुरुवर्य नारायण गिरी महाराज यांनी दिक्षा दिली होती.

हरी कीरतन व शास्त्रीय अभ्यासाचे धडे ह.भ. प लक्ष्मण महाराज वाकचौरे
( तेली बाबा शिर्डीकर ) यांच्याकडून गिरवले.
 वैदू समाजातील प्रथम कीर्तनकार होते
मोडी लिपी चे तज्ञ व गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याति होती व त्यामुळे परिसरातील मोडी लिपितील कागद वाचण्यासाठी अनेक लोक त्यांच्याकडे येत.
वृत्ती प्रभाकर व ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे गाढे अभ्यासक, त्याकाळी माजी मंत्री व्यंकटराव हिरे साहेब हे या ग्रंथाच्या  अभ्यासासाठी ह. भ. प. लक्ष्मण महाराज  वाकचौरे यांच्याकडे आले होते, त्यांना लक्ष्मण महाराजांनी गोपाळ महाराज गुढे यांच्याकडे हिरे साहेबांना वृत्ती प्रभाकर च्या अभ्यासासाठी पाठवले.
 ते राहता येथील गायनाचार्य ह.भ.प. वै. रामभाऊ महाराज शिंदे यांचे मेहुणे होते. तसेच महंत स्वामी सहजानंद भारतीजी यांच्या आग्रह खातर जैमुनी अश्वमेघ पुराणाचे वाचन राहता येथील पुरातन मारुती मंदिर येते अनेक वर्ष पारायण केले.

लक्ष्मण महाराजांच्या शिर्डी पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात त्यांचा अनेक वर्ष हिरिरीने सहभाग होता.
पसायदान ते अतिशय सोप्या व ओघवत्या शैलीत सामान्यांना समजेल असे सांगत त्याबद्दल देवाची आळंदी येथेल साधक आश्रमाचे ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला.
तसेच त्यांनी आजन्म ब्रम्हचार्याचे पालन केले त्यांना शिरडी ग्रामस्थाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते,मा उपनगराध्यक्ष निलेश कोते, कुष्णा शिंदे, राहुल गोंदकर यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
close