shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुस्तीपटूनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे - मुकुंद सिनगर

शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन ) :
 धार्मिक बातमी

कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र भोजडे येथील जागृत देवस्थान श्री विरभद्र महाराज यात्रौत्सव - 2022 निमित्त आज तारीख 9 रोजी दुपारी 03 वाजता समस्त भोजडे ग्रामस्थ, यात्रा कमिटी व भोजडे ग्रामपंचायत यांच्या वतीने "भव्य कुस्ती हंगामा" आयोजित करण्यात येत असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने भोजडे नं.2 सोसायटीचे चेअरमन श्री. मुकुंद सिनगर यांनी दिली. आज यात्रेचा तिसरा दिवस असून दोन वर्षाच्या खडतर कोरोना काळानंतर तीन दिवस मोठी यात्रा भरलेली असून या वर्षी पंचक्रोशीतुन शेकडो भक्त जागृत देवस्थान श्री विरभद्र महाराज चरणी नतमस्तक होत आहे.

100 वर्षाची अखंड परंपरा असणाऱ्या या भोजडे यात्रौत्सवातील "कुस्ती हंगामा" हा कुस्तीपटूसाठी कोपरगाव तालुक्यातील सर्वात मोठा उत्सव असून जिल्ह्यातील अनेक पहिलवान मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात. गेल्या दहा वर्षापासून भोजडे नं.2 विकास सोसायटीचे संस्थापक चेअरमन कै. सिताराम व्यंकटराव पा. सिनगर यांच्या स्मरणार्थ "भोजडे केसरी" आणि श्री साई एकता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कै. प्रविण गणपतराव पा. गोंदकर यांच्या स्मरणार्थ "भोजडे श्री" या मानाच्या ट्रॉफीसह रोख रक्कमेची बक्षिसे दिली जातात. यामध्ये शेवटच्या कुस्ती स्पर्धेत काही साखळी सामने खेळले जात असून शेवटी विजेता घोषित केला जातो. ज्यात विजेता पैलवानास मानाची शॉल, ट्रॉफी व रोख रक्कम बक्षिस स्वरूपात देऊन सन्मानित करण्यात येते. तरी जास्तीत जास्त संख्येने कुस्तीपटू उपस्थित राहण्यासाठी भोजडे नं.2 सोसायटीचे चेअरमन मुकुंद सिनगर आणि श्री साई एकता ग्रुपचे अध्यक्ष सुधाकर वादे यांनी जाहीर आवाहन केले आहे.

सदर यात्रौत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी भोजडे गावातील सर्व मार्गदर्शक जेष्ठ मंडळी, तरुण मंडळी, भोजडे ग्रामस्थ, यात्रा कमिटी, भोजडे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य हे मेहनत घेत आहे.
close