shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्यापासून श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र आळंदी पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान

नांदूरखी :- सालाबादप्रमाणे याही वर्षी शिर्डी आणि पंचक्रोशीतुन श्री साईबाबा  पायी पालखी सोहळ्याचे आयोजन दिनांक शुक्रवार 11/11/2022 रोजी ते मंगळवार दिनांक 22/11/2022 या कालावधीत करण्यात आले असून या पायी पालखी सोहळ्यात आपण सहभागी होऊन हरिनामाचा लाभ घ्यावा असे आवाहन साईबाबा वारकरी शिक्षण संस्थेचे मठाधिपती महामंडलेश्वर महंत काशिकानंद महाराज भालेराव यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले आहे या पायी दिंडी सोहळ्यात ह.भ.प.विश्राम महाराज ढमाले रमेश महाराज क्षिरसागर दत्तात्रय डांगे भाऊसाहेब थेटे विष्णुपंत डांगे रामनाथ महाराज शहाजी वाणी भाऊसाहेब मते सोपान कापे रावसाहेब पवार बापू शिंदे भाऊसाहेब कोते श्री गायके श्री अरागळे यांच्यासह अनेक भाविक मंडळी व्यवस्था पण करीत आहे या भक्ती मय कार्यक्रमासाठी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते अर्जुन राव चौधरी विजय कोते भाऊसाहेब कातोरे भानुदास गोंदकर महेंद्र शेळके नानासाहेब काटकर यशवंत गायके आदी मान्यवर सहकार्य करणार आहेे. तर कीर्तनकार विश्राम महाराज ढमाले रमेश महाराज रामनाथ महाराज बाळू महाराज लक्ष्मण महाराज चंद्रकांत महाराज नरोडे हर्षद महाराज लहू महाराज आदिनाथ महाराज रयवंत महाराज आदी कीर्तन सेवा देणार आहेत तर अश्व सौजन्य रथाची व्यवस्था तुषार चौधरी यांच्यासह उत्तम महाराज कालेकर शिर्डी निमगाव निघोज राहाता कणकुरी साकुरी शिंगवे सावळी विहीर मंजूर हंडेवाडी रुई कोराहळे कोकम ठाण आदी गावातील वारकरी महिला पुरुष सहभागी होणार आहे तरी या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प. काशिकानंद महाराज यांनी केले आहे.


छत्तीस वर्षाची परंपरा पायी दिंडी सोहळ्याला लाभल्याने या पायी दिंडी सोहळ्यात अक्षरशः हरिनामाचे चिंतन होऊन छत्तीस वर्षांपूर्वी चा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीची लागलेली ओढ आजही जिवंत आहे :-महंत काशिकानंद महाराज भालेराव
close