shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे पाहणार शिर्डी साई संस्थानचा कारभार...!

नगर प्रतिनिधी : (तुषार महाजन) 

महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या भाग्यश्री बानायत यांची नागपूरच्या विदर्भ वैधानिक विकास महामंडळामध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.



कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून मुंडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना कुटुंबकल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे. मुंडे यांच्या बदलीचा विक्रम झाला आहे. आतापर्यंत १६ वर्षात मुंडे यांच्या २० पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत. मुंडे हे २००५ सालच्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत.

close