shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहारच्या सततच्या पाठपुराव्याने अहमदनगर औरंगाबाद हायवेची वेळोवेळी दुरुस्ती ..!

प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे नेवासा फाटा येथे महामार्गाच्या कामाला भेट दिली..

राहुरी । प्रतिनिधी:-
15 सप्टेंबर रोजी प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रस्ता सुरक्षा कमिटीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेमध्ये व सार्वजनिक बांधकाम विभाग व वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यां समक्ष जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग व जिल्ह्याला जोडणारे इतर राज्य मार्गांच्या समस्यांबाबत जिल्हाध्यक्ष पोटे यांनी समक्ष पुराव्यानिशी बैठकीत आवाज उठवल्याने अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख राज्य मार्ग दुरुस्ती वेगाने सुरू तर झालीच पण अहमदनगर औरंगाबाद हायवे ची अत्यंत जलद गतीने दुरुस्ती सुरू झाली आहे नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौक ते नेवासा चौकाच्या पुढे नेवासा फाटा हद्दीपर्यंत डिव्हायडर गतिरोधक रिफ्लेक्टर हे काहीही नसल्यामुळे आठवड्याला अपघात होत होते.




अपघात झालेली बेवारस मृतदेह आढळत होते प्रहारच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या वर्षी २ कि.मी डिव्हायडर आणि गतिरोधक तर झालेच पण रिफ्लेक्टर गतिरोधक दर्शवणारे फलक डिव्हायडर सुरू होण्यापूर्वी असणारे रिफ्लेक्टर फलक बसवण्यात आले होते वर्षभरापासून पुन्हा ते फलक डिव्हायडर नादुरुस्त झाले होते 15 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये अहमदनगर पासून तर औरंगाबाद पर्यंत जागोजागी डिव्हायडर स्थानिक व्यावसायिकांनी फोडले असल्याने व जागोजागी असणारे रिफ्लेक्टर फलक गायब असल्याने रस्ता अत्यंत धोकादायक होऊन सतत होणाऱ्या अपघातांची मालिका सुरू झाली असल्याचे जिल्हाध्यक्षांनी लक्षात आणून दिले असता जिल्हाधिकारीं महोदयांनी वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांना व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना धारेवर धरले असता तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून संबंधित विभागामार्फत युद्ध पातळीवर हायवेच्या कामांची दुरुस्ती सुरू झाली आहे.

 नेवासा फाटा येथे नेवासा चौकामध्ये कामाची पाहणी करताना प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे व नेवासा तालुकाध्यक्ष जालिंदर आरगडे
close