shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"सी.के‌.गोयल राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दापोडी परिसरात"स्वच्छता प्रभात फेरीचे" आयोजन


पुणे:- दापोडी, पुणे येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्रीमती सी.के.गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालय 
             आणि       
 पिंपरीचिंचवडमहानगरपालिका आरोग्य विभाग दापोडी यांच्या "संयुक्त विद्यमाने"स्वच्छता पंधरावडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

              शनिवार दिनांक ५/११//२०२२ पासून स्वच्छता पंधरावड्याला सुरुवात झाली असून त्या अंतर्गत वेगवेगळे स्वच्छतेचे कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहेत.
   नुकतीच दापोडी परिसरात स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन चांगल्या आरोग्याचे संदेश देण्यासाठी "स्वच्छता प्रभात फेरीचे" आयोजन करण्यात आले.
        "स्वच्छ भारत अभियानांतर्गत" स्वच्छता पंधरावडा कार्यक्रमाचा एकभाग म्हणून हा उपक्रम घेण्यात आला.
      विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण व्हावी, परिसर स्वच्छतेचे महत्व समजावे,  सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व समजावे, प्लास्टिक निर्मूलनाबाबत जागृती निर्माण व्हावी, चांगल्या आरोग्याचा संदेश समाजापर्यंत जावा, स्वच्छ व आरोग्य संपन्न दापोडीचा उद्देश संपन्न व्हावा. या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
       "स्वच्छता प्रभात फेरी"उपक्रमांतर्गत गोयल महाविद्यालयातील प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यां, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचारी असे मिळून६३ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.
   "स्वच्छता फेरी" महाविद्यालया च्या प्रांगणातून सुरू होऊन दापोडी परिसरातील शिवाजी पुतळा चौक, आंबेडकर पुतळा चौक, रेल्वे स्टेशन परिसर या मार्गे दापोडी मध्ये फिरविण्यात आली.

    स्वच्छता प्रभात फेरीमध्ये

स्वच्छ ठेवा स्वच्छ ठेवा!
परिसर आपला स्वच्छ ठेवा!

वापर टाळा वापर टाळा!
वापर टाळा प्लॅस्टिकचा वापर टाळा!
स्वच्छ दापोडी! सुंदर दापोडी!

स्वच्छता राखा घरोघरी!
  आरोग्य तेथे वास करी!

परिसर स्वच्छतेची जबाबदारी कोणाची!
तुमची आमची सर्वांची!

यासारख्या घोषणांनी दापोडी परिसर दुमदुमून गेला होता
.
कार्यक्रमाचे संयोजन: राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख  प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे यांनी केले.

     प्रभात फेरीची सुरुवात: महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुभाष सूर्यवंशी यांनी श्रीफळ वाढवून केली.
  प्रभात फेरी मध्ये  प्रा.सिद्धार्थ कांबळे,प्रा. परबतराव बैसाणे, प्रा अमरदीप गुरमे, प्रा. महेंद्र शिंदे, प्रा.प्रितिश पठारे प्रा.दिपाली खर्डे, प्रा.पवार प्रियंका, श्री. लक्ष्मण कोहिणकर, श्री. लक्ष्मण मुरकुटे, श्री. कपिल कांबळे, आणि
       पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाचे मा.भूपेश बोडके, मा. नेहा साठे, मा. मयुरी काकडे, मा. अतुल वाघमारे, मा. विजय पेंडे, मा. मंगेश साळवे मा. अमित गोरे, मा .संजय पवार हे विद्यार्थ्यांबरोबर सहभागी झाले होते.
   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी. विद्यार्थ्यांमध्ये संदेश जाधव, ईश्वर साळुंके, वैभव रासकर, नरेंद्र कांबळे, धनश्री कदम, प्राजक्ता कांबळे, अभिलाषा कांबळे, भूमिका काळे, कीर्ती आगलावे, वैष्णवी कदम, प्रज्ञा सूर्यवंशी, स्नेहल कांबळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

आभार: प्रा. सिद्धार्थ कांबळे यांनी मानले. 
    कार्यक्रमाचा समारोप: "वंदे मातरम !"गीताने झाला.

     कार्यक्रमाच्या शेवटी
 विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
close