पुणे:-"गायरान जमिनीवरील अतिक्रमण (निवास) प्रश्ना संदर्भात गोसासी ता.खेड जि.पुणे येथीलशेतकऱ्यांची नियोजन बैठक संपन्न!"-बैठकीत न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई करण्याचा केला शेतकऱ्यांनी निर्धार!
संपूर्ण राज्यात गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात नोटीसा गावोगावी शेतकऱ्यांना मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी भयभीत झाला असून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. वर्षानुवर्ष वास्तव्यास असणाऱ्या लोकांनी घरांसाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुंतवणूक केली असल्यामुळे चिंतेचे वातावरण सर्वांमध्ये आहे.
खेड तालुक्यातील गोसासी या जागृतगावात गावातील गायन जमिनीवरील निवासी वास्तव्यास असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र गुरुवार दिनांक १७/११/२०२२ रोजी सायंकाळी ७:०० ते ९:०० या वेळेत माळवस्ती गोसासी राम मंदिर प्रांगणातचर्चा बैठक संपन्न झाली. आणि सद्य:स्थितीतील या प्रश्नासंदर्भात कशा पद्धतीने लढा द्यायचा,कोणत्या मार्गांचा अवलंब करायचा' याबाबत सलाम- मसलत करून नियोजन केले.
गोसासी गावातील माळ वस्तीवरील एकूण ७०ते ७५ कुटुंबे ही गायरान जमिनीवर १९५० सालापासून वास्तव्यात असून मोठा खर्च करून पक्की घरे बांधली आहेत. या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या अनेक लोकांची ही चौथी पिढी आहे. त्यांच्या घरांच्या नोंदी सुद्धा झालेले असून नियमित घरपट्टी भरत आहे. असे असतानाही त्यांना नोटीसा देण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यासाठी बैठक घेऊन शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रश्नासंदर्भात लढा देण्याचे या बैठकीत ठरविले आहे.
या बैठकीसाठी मा. श्री. भरत शेठ पवळे (अध्यक्ष, शिवशंभु छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य) प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे(पुणे जिल्हासंघटक शिवशंभु छावा प्रतिष्ठान) श्री. काशिनाथ हजारे (मार्गदर्शक, शिवशंभु छावाप्रतिष्ठान) मा. श्री. मयूर दौंडकर (युवाआघाडी, खेड तालुका आम आदमी ) मा. श्री. संदीप पाटील (प्रदेश, सह संघटकआम आदमी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य.) मा. श्री. संतोष गोरडे (सरपंच गोसासी) मा. श्री. मारुत राव गोरडे, (उपाध्यक्ष, खेड ता.स्वाभिमानी शेतकरी संघटना)यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सदर बैठकीसाठी मीराताई गोरडे (उपाध्यक्ष ,खेड तालुका शिवशंभू छावा प्रतिष्ठान) मा. संभाजीराजे गोरडे (मा. उपसरपंच) मा. एकनाथ गोरडे (ग्रामपंचायत सदस्य) मा. नारायण पुरी (मा. उपसरपंच) अश्विनीताई गोरडे (ग्रामपंचायत सदस्य)मा. सचिन गोरडे, मा. चंद्रकांत गोरडे आणि गोसासी गावातील बाधित शेतकरी, महिला, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषता महिलांची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणात होती.
सदर बैठकीमध्ये गायरान जमिनीवरील निवास प्रश्नासंदर्भात न्यायालयीन पातळीबरोबर रस्त्यावर उतरून संघटितपणे लढा उभा करून शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसायचे नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला.
गोसासी गावचे सरपंच श्री. संतोष गोरडे यांनी ग्रामस्थांना आधार देत या प्रश्नासंदर्भात मी गावचासरपंच या नात्याने सर्व बाधित शेतकऱ्यांबरोबर असून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे स्पष्ट केले.
गोसासी गावाबरोबर बरोबर खेड तालुक्यातील सर्व गावांमध्ये गायरान जमिनीवरील निवासी बाधित शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन प्रश्न समजा सणवून घेऊन या प्रश्नाबाबत मोठे तीव्र आंदोलन उभे करण्याचा निर्धार मा. श्री. भरत पवळे,प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे, मयूर दौंडकर, संदीप पाटील, व्यक्त केला आहे.

