shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपळनेरात ४० वर्षानंतर पहिले खुले काव्य संमेलन उत्साहात संपन्न..

महात्मा फुले विद्या प्रसारक संस्थेचे कविवर्य संभाजीराव पगारे याची संकल्पना

शिर्डी :-  पिंपळनेर ता. साक्री येथील महात्मा फुले विद्या प्रसारक संस्थेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त तब्बल 40 वर्षानंतर घेण्यात आलेले पहिले खुले कवी संमेलन वेगवेगळ्या कविता गझल चारोळ्या कविता सादर करीत  मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी कवींनी सादर केलेल्या कवितांना रसिक स्रोत्यांच्या टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळत चांगलीच दाद मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक कवी विचारवंत  प्रा.डॉ आनंद अहिरे नाशिक, ' उद्घाटक  लेखक कवी जगदीश देवपूरकर, धुळे,  प्रमुख पाहुणे म्हणून  साहित्यिक म्हणून प्रा. संघर्ष सावळे संभाजीनगर , साहित्यिक तान्हाजी खोडे नाशिक,  कवी अजय बिरारी नाशिक, ॲड संभाजी बापुसाहेब पगारे सौ. पुष्पलता पगारे, संचालक विष्णू जिरे पाटील, विजयराव सोनवणे,अण्णा हरी नेरकर, प्रा.डॉ.मस्के प्रा. डॉ.खरात आदी उपस्थित होते.याप्रसंगी कविवर्य देवपूरकर यांनी दीपप्रज्वलन व कविता सादर करून काव्य मैफिलीस सुरूवात झाली. 

ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक २८ नोव्हेंबर रोजी संस्थेच्या माधवस्मृती आदिवासी आश्रमशाळा सामोडे येथे संस्थेच ॲड संभाजी पगारे यांच्या आयोजनातून व संस्थेच्या सचिव सौ . पुष्पलता पगारे ' सहसचिव विष्णू जिरे पाटील  उपाध्यक्ष स्वप्नील पगारे '  संचालिका  सौ . छाया पगारे यांच्या सहकार्याने . प्रा . डी . टी .पाटील  पत्रकार राजेंद्र गवळी  विजयराव सोनवणे ' लेखक साहेबराव नंदन ' कवी ललितभाऊ साळवे यांच्या संयोजनातून पिंपळनेर नगरीतील पाहिले भव्य खुले काव्य संमेलन उत्साहात पार पडले . 
 प्रथम व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वच पाहुण्यांनी महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले फुले यांच्या जीवनावर आधारित काव्यात्मक रचना सादर केल्या व त्यांच्या कार्याचा गौरव केला .  

यावेळी प्रमुख पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ सन्मान पत्र ' ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला . विशेषतःहा ग्रामिण भागातील आदिवासी बहुल विभागातील पिंपळनेरचे  खुले काव्य संमेलन हे पहिलेच होते . उपस्थित सर्वच कवी कवयित्री महिला वर्गाने उत्कृष्ठ रचना 'चारोळ्या ' गीते सादर करून संमेलनात रंगत वाढवली होती . ताल सुर ठेका यांचा समन्वय प्रत्येक साहित्यिकांच्या रचनेतून काव्याचा आनंद मिळत होता. यावेळी सौ पुष्पलता पगारे यांचे गीत सोळा सोमवारचे या स्व रचित व लिखित ओवी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. 
प्रीती मोरे ,कविवरे भोपाल देशमुख, अजय बिरारीस, प्रतिभा देशमुख ,बाळू सोनवणे, साहेबराव नंदन, कुणाल शिरोडे ,कोमल शिंदे, सौरभ आहेर, अजय बिरारी,नाशिक, प्रा.एस.डी.पाटील ,पोर्णिमा भामरे ,फकरीभाई बोहरी, रेखा पाटील, सौ ललिता जाधव, आशालाता पाटील, भोजराज चव्हाण , उमेश माळी यांच्यासह अनेक कवींनी अतिशय उत्कृष्ट काव्य सादरीकरण करून उपस्थित रसिकांचे मन जिंकले. कविता विरह,भावगीत ,अहिराणी, आदिवासी, कोकणी गीत तसेच महात्मा फुलांच्या जीवनावर आधारित अशा विविध काव्यप्रकार सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. 
शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन नियोजन होते . पत्रकार राजेंद्र गवळी यांनी प्रास्ताविक केले. 'तर संस्थचे अध्यक्ष ॲड संभाजीराव पगारे यांनी कार्यक्रमाचा उद्देश ' ध्येय धोरण ह्या विषयावर मार्गदर्शन करून महात्मा फुले यांच्या जीवनावर उत्कृष्ठ रचना सादर केली . ग्रामिण भागातील नवोदित सर्वच साहित्यिकांना ह्या पुढे हक्काचे खुले काव्य संमेलनाचे व्यासपीठ ह्या ठिकाणी दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी उपलब्ध करून दिले जाईल,  असे संभाजी पगारे यांनी सांगितले. कुमारी रुपाली कन्हैयालाल चौधरी व प्रा.डी.टी.पाटील व जगदीश देवपूरकर यांनी  काव्यातून सादरीकरण करत कार्यक्रमाची रंगत वाढवत बहारदार सूत्रसंचालन केले.  शेवटी संस्थेच्या वतीने सर्वच सहभागी कवीनां सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ह्या प्रसंगी सर्वच मान्यवरांनी संस्थेचे व आभार मानले . ह्या प्रसंगी पिंपळनेर येथील आ.मा.पाटील महविद्यालयाचे प्रा.डॉ.सतिष म्हस्के यांनी अभिप्रायात नमुद केले की खांदेशच्या मातीतील उगवते कवी जेष्ठ साहित्यिक यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. 

आभारप्रदर्शन उमेश माळी यांनी केले. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.ह्या काव्य संमेलन सोहळ्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक व  संस्थेच्या सर्वच सेवक वृंदानी परिश्रम घेतले . सहभागी कवींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.
close