शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :-
जि.प.केंद्रशाळा देशशिरवाडे येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती संगिता रायते यांनी स्वीकारले. शाळेतील शिक्षक श्री.अनिल काकुस्ते ,श्रीमती उज्वला सोनवणे,श्री महेंद्र महाले, तसेच पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची भाषणे झाली तसेच श्रीमती उज्वला सोनवणे यांनी संविधान दिनाविषयी मार्गदर्शन केले. श्री महेन्द्र महाले सरांनी संविधान दिनानिमित्त उद्देश पत्रिकेचे वाचन केले व त्याचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच श्रीमती संगिता रायते यांनी संविधान दिनानिमित्त उद्देश पत्रिकेचे महत्व, प्रास्ताविक, मुलभूत हक्क व कर्तव्य, जबाबदारी याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच सामुदायिक संविधानाचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी सूत्रसंचालन श्री. महेंद्र महाले यांनी केले व श्रीमती उज्वला सोनवणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

