shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वालचंदनगर येथे इंदापूर अर्बन बॅंकेचे उपाध्यक्ष सत्यशिल पाटील यांची चार चाकी गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घडली घटना.

वालचंदनगर येथे  इंदापूर अर्बन बॅंकेचे उपाध्यक्ष सत्यशिल पाटील यांची चार चाकी गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवून  दिल्याची धक्कादायक घडली घटना.                 इंदापूर प्रतिनिधी: वालचंदनगरमधील नवीनबाजारपेठ   येथे इंदापूर अर्बन बॅंकेचे उपाध्यक्ष  व इंदापूर तालुका केमिस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष सत्यशिल पाटील यांची राहत्या  ठिकाणी चार चाकी  फोर्ड कंपनीची इको स्पोर्ट गाडी    एम.एच. ४२ झेड ८८९९ या वर   अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी धक्कादायक घटना रात्री घडली.    
सत्यजित पाटील यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने  यांनी गाडीची लागलेली आग  विझवली. याप्रकरणी सत्यशिल पाटील यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली असून त्यांच्या गाडीचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बनसोडे करीत आहेत.
सदर गाडी पेटवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा व असल्या कृतीचा भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका सोशल मीडिया उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे यांनी निषेध व्यक्त केला आहे.
close