प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मिडीयाच्या केज तालुका अध्यक्षपदी रामदास तपसे यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिवपदी पत्रकार गौतम बचुटे यांची निवड करण्यात आली आहे.
आणि अजय भांगे यांची संघटकपदी निवड करण्यात आली आहे. या बाबतची माहिती अशी की,दि.४ नोव्हेंबर रोजी वडवणी येथे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस.एम.देशमुख सर आणि डिजिटल मिडिया प्रमुख अनिल वाघमारे,तसेच मराठी पत्रकार परिषद डिजिटल मिडिया जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसट आणि मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सदस्य विजयराज आरखडे यांच्या उपस्थितीमध्ये वडवणी तेथे मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडीयाचे पहिले जिल्हास्तरीय अधिवेशन पार पडले.
या अधिवेशनात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर आणि डिजिटल मिडिया प्रमुख अनिल वाघमारे सर, तसेच मराठी पत्रकार परिषद डिजिटल मिडिया बीड जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसट आणि मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सदस्य विजय आरखडे यांच्या उपस्थिती मध्येच मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया केज तालुका अध्यक्षपदी रामदास तपसे यांची तर सचिवपदी गौतम बचुटे आणि उपाध्यक्षपदी प्रकाश मुंडे व संघटकपदी अजय भांगे यांची निवड करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच तालुका स्तरावरील मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया पदाधिकऱ्यांच्या उर्वरित निवडी लवकर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष रामदास तपसे यांनी दिली .

