shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे यांचे पहिले यश...! भारत सरकारची योजना आपल्या दारी...!!

पुणे । प्रतिनिधी :-
अखिल वडार बोली साहित्य संमेलन मंडळ, पुणे संस्थापक अध्यक्ष - मा. टी. एस. चव्हाण जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत आणि सहकारी यांचे पाठपुराव्यामुळे  भटक्या विमुक्त जाती करिता भारत सरकारचे  सामजिक न्याय अधिकारिता मंत्रालय भारत सरकार ( विमुक्त, घुमंतू अथवा अर्धे घुमंतु  सामुदायिक साठी विकास कल्याण बोर्ड) यांनी दखल घेऊन मा. श्री. संजय कोहली, उपसचिव -  सामाजिक न्याय एवं अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांनी दिलेल्या पत्रात कल्याणकारी योजनांचा माहिती दिले आहे.

आपल्या भारत सरकारच्या भटक्या विमुक्त जाती कल्याणकारी योजना आपल्या दारी आले आहे. कदाचित ही योजना पहिले अंमलात आणली असावे, परंतु सर्व सामान्य जनमानसात ही माहिती मिळालेली नाही‌. त्यामुळे जवळ जवळ ९८% लोकांना ही योजना माहीत नाही. समाजात जनजागृती व्हावे, गोरगरिब उच्च शिक्षणापासून व इतर अनेक सुविधा पासून वंचित राहू नये, यासाठी आपल्या वडार समाज संघटना, समाजसेवक, समाजसेविका यांनी ही माहिती गरजूंना उपलब्ध करून दिले तर समाज सुधारण्यास नक्कीच मदत होणार आहे.

भटक्या विमुक्त विद्यार्थी- विद्यार्थिनी जे उच्च शिक्षण एमपीएससी यूपीएससी अथवा सी ए तत्सम परीक्षा दयायचे आहे, त्यासाठी शिकवणी घ्यायचे इच्छा आहे, परंतु आर्थिक परिस्थिती गरीब आणि हलाखीचे आहे.अशा होतकरू आणि हुशार विद्यार्थी व विद्यार्थिनी वंचित राहू नये, म्हणून सर्व जबाबदारी भारत सरकार करत आहे.

आरोग्य विमा पॉलिसी योजना आहे. या गटात घरकुल योजनेचा आर्थिक  लाभ घेता येतो
सामाजिक दृष्ट्या मोठा गट तयार असल्यास अनेक मूलभूत गरजा पूर्ण भारत सरकार करते.

ही योजना लाभार्थी सहज आणि सोप्या पद्धतीने ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण करता येते, त्यासाठीच एक पोर्टल विकसित केले जाणार आहे.
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1798564
*या पोर्टलचा उपयोग करून लाभार्थी अनेक सुविधा प्राप्त करू शकतात.

अधिक माहिती साठी
श्री. टी. एस. चव्हाण, छ. संभाजीनगर जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत
अध्यक्ष, अखिल वडार बोली साहित्य संमेलन मंडळ पुणे
मोबाईल नंबर- 72187 93835
close