राष्ट्रीय विचारांचा जागर करणारा दिवाळी अंक
प्रतिनिधी : संजय वायकर
मुंबई : ५ / सोलापूरच्या पूर्वपुण्य या राष्ट्रीय विचारांचा वसा घेऊन अविरतपणे वाटचाल करणाऱ्या पूर्वपुण्य या मासिकाच्या दिवाळी अंकाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला.
पूर्वपुण्य हे मासिक गेल्या बारा वर्षांपासूनही अधिक काळ सोलापूरहून प्रकाशित होत असून सोलापूरचे सुपुत्र नितीन कवठेकर हे प्रमुख संपादक असून, 'राष्ट्रीय विचार जागराची शताब्दीकडे वाटचाल' असे शीर्षक देऊन त्यांनी या दिवाळी अंकाची निर्मिती केली आहे.
सध्याच्या डिजिटल जमान्यात मासिक चालविणे अत्यंत कठीण आहे.तरीही राष्ट्रीय विचारांचा जागर करण्याचे काम ते जिद्दीने आणि नेटाने करतात.या राष्ट्रीय कार्यासाठी त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन या मासिकाला शक्य तितके सहकार्य आम्ही निश्चित करु.या दिवाळी अंकास आमच्याही लाख-लाख शुभेच्छा असे गौरवोद्गार काढत मा . मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या .
या अंकाच्या निर्मितीसाठी पूर्वपुण्य टीमचे अमूल्य सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत, आभार, सूत्रसंचालन 'पूर्वपुण्य' मासिकाच्या टीमने केले.

