shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वटवृक्ष मंदिरात 'गावगाथा'दिवाळी अंकाचे प्रकाशन


प्रतिनिधी : आसावरी वायकर

अक्कलकोट : ५ /   सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट  येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेशजी इंगळे यांच्या हस्ते, 'गावगाथा' या पहिल्याच दिवाळी अंकाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी अंकाचे संपादक धोंडप्पा नंदे,प्रा. अमोघसिद्ध चेंडके, तजमुल शेख, लक्ष्मण केंगार, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीष पवार, विपुल जाधव, सागर गोंडाळ, संजय पवार, चंद्रकांत कवटगी, प्रसाद सोनार इ. मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख अतिथी महेशजी  इंगळे आपल्या भाषणात म्हणाले की,"धोंडप्पा नंदे यांच्या 'गावगाथा' या पहिल्याच दिवाळी अंकाने वाचकांची मने जिंकली आहेत.या अंकातून त्यांनी, कला,साहित्य, संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या पाठीशी आमच्या शुभेच्छा आणि स्वामी महाराजांचे शुभाशीर्वाद कायम राहतील."

 हा दिवाळी अंक साकार करण्यासाठी अंबादास गवंडी, तुषार पाटील, अमोघसिद्ध चेंडके, योगेश कबाडे, जितेंद्र साळुंके, ओंकार क्षीरसागर, सोलापूरचे- मल्लू डिजिटल, पुण्याचे मुद्रक- सॉफ्टस्कील ग्राफिक्स, लेखक, कवी, जाहिरातदार, हितचिंतक, यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत, आभार आणि सूत्रसंचालन गावगाथा परिवाराने केले .
close