shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय मराठा महासंघाची सर्वसाधारण सभा पंढरपूर येथे २० नोव्हेंबरला होणार - राजेंद्र कोंढारे


प्रतिनिधी : किशोर चाकोते

पंढरपुर : ५ /   अखिल भारतीय मराठा महासंघाची सर्वसाधारण सभा पंढरपूर येथे २० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी दिली आहे.

       श्री. कोंढरे यांनी प्रसिद्धीस दिलेले पत्रकात म्हटले आहे की, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्वसाधारण सभेत २०२२ ते २०२५ या तीन वर्षाकरिता पदाधिकारी निवड करण्यात येणार आहे. सभेची सविस्तर नोटीस महासंघाच्या  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून ती सभासदांनी पहावी तसेच देशातील सर्व राज्यातील अनेक  प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

         अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील यांची आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदी निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन, महामंडळाच्या योजना, उद्योजक घडविणे इ विषयावर चर्चा होणार आहे. मराठा समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

         २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता तनपुरे महाराज मठ, लक्ष्मी रस्ता पंढरपूर या ठिकाणी होणाऱ्या या बैठकीस नगर जिल्ह्यामधून शेकडोच्या संख्येने पदाधिकारी उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर नगर जिल्हाध्यक्ष लालूशेठ दळवी, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, सरचिटणीस रमेश बोरुडे, भाऊसाहेब वाकचौरे पाटील, युवक अध्यक्ष ओम काळे, अकोले तालुकाध्यक्ष भानुदास गायकर, संगमनेर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वराळे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दत्ता मोडे, राहता तालुकाध्यक्ष प्रकाश निर्मळ, नेवासा तालुकाध्यक्ष दादा बेल्हेकर, प्रकाश हासे, बाळासाहेब नेहे यांनी केले आहे.
close