पुणे । प्रतिनिधी :-
शनिवार दिनांक ५/११/२०२२ रोजी सकाळी९.30 ते १२:०० या वेळेत महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर 'श्रमसंस्कार' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांमध्ये श्रम प्रतिष्ठान निर्माण व्हावी, श्रमाचे महत्त्व समजावे, प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा,उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केलेल्या एकत्रित श्रमदानातून श्रीमती. सी.के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालय, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय, इंग्रजी माध्यमाची शाळा यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान खेळासाठी व इतर कार्यक्रमासाठी उपयुक्त होईल अशा पद्धतीने तयार करण्यात आले.
श्रमदानातून क्रीडांगणावरील बाभळीची, बोरीची झुडपे, मोठे वाढलेले गाजर गवत, केरकचरा, प्लास्टिक विद्यार्थ्यांनी काढून परिसर स्वच्छ केला.विशेष म्हणजे विद्यार्थी व प्राध्यापकांनी एकत्र श्रमदान करून एक चांगला उपक्रम राबविला गेला.कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी व प्राध्यापक मिळून ५५ व्यक्तींनी सहभाग घेतला.
श्रमदान कार्यक्रमासाठी विळे, खुरपी, टिकाव, खोरी, कुदळी, घमेली, यांचा वापर करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन: प्र. प्राचार्य, डॉ.सुभाष सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजने विभाग प्रमुख, प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे, आणि राष्ट्रीय विभागातील इतर प्राध्यापकांनी केले.
श्रमदान कार्यक्रमांमध्ये प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे, प्रा.सिद्धार्थ कांबळे,प्रा. परबतराव बैसाणे, प्रा. महेंद्र शिंदे, प्रा.वैभव वरडुले, प्रा.प्रितिश पठारे, प्रा.उत्तम गोरड, प्रा.डावखर वैभव, प्रा.नेरकर राजेंद्र, प्रा.दिपाली खर्डे, प्रा.वाणी रोहिणी, प्रा.पवार प्रियंका, श्री. लक्ष्मण कोहिणकर, श्री. लक्ष्मण मुरकुटे, श्री. कपिल कांबळे, यांनी विद्यार्थ्यांबरोबर सहभागी होऊन स्वतः श्रमदान केले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

