नगर । प्रतिनिधी :-
चास येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोबतच महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबवत करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देत आहेत. यातीलच एक भाग म्हणजे डिप्लोमा, डिग्री व एमबीएच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता पुणे, रांजणगाव व गुजरात एम आय डी सी मधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या महारोजगार मेळाव्याचे आयोजन ५ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कौशल्य विकासासाठी विविध विषयांवर सहभागी झालेल्या नामांकित कंपन्यांनी संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रा. अनिरुद्धजी आडसूळ, उपाध्यक्ष मा. श्री विश्वनाथ आडसूळ , प्राचार्य डॉ. प्रदीप एम पाटील, उपप्राचार्य प्रा. किशोर जाधव व विविध विभाग प्रमुख यांच्यासोबत चर्चा करून संस्थेसोबत या सर्व नामांकित कंपन्यांनी सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षऱ्या करून घेतल्या व भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना या स्पर्धात्मक युगामध्ये स्वतःचा विकास करून नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जेबीएल इंडिया लि. अंतर्गत फोर्ड मॅनेजमेंटचे फिल्ड मॅनेजर मा.श्री.राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सर्व विद्यार्थ्यांना नोकरीची हमी दिली त्यासाठी कोणती कौशल्ये लागतात त्याची सविस्तरपणे माहिती दिली. आडसूळ शैक्षणिक संकुलाचे प्लेसमेंट अधिकारी श्री.दिगंबर पवार यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणकोणती कौशल्य विकसित करावी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.टाटा स्ट्राइव्ह कंपनी चे एच.आर. मा. श्री.सुबोध जाधव यांनी वेगवेगळ्या करिअर सर्टिफिकेशन विषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना सर्टिफिकेशन करण्यास सांगितले.
त्याचबरोबर प्राचार्य डॉ प्रदीप एम पाटील यांनी आलेल्या सर्व एच आर यांचे स्वागत करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मुलाखतीस सामोरे कसे जावे याचे धडे देऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ यांनी मार्गदर्शन करत असताना, माझ्या संस्थेतील विद्यार्थ्यांना मदत व्हावी हाच सामाजिक मानस असल्याचे सांगितले. याचप्रमाणे दरवर्षी विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले.
आडसूळ टेक्निकल कॅम्पस मधील डिप्लोमा ,इंजीनियरिंग व एमबीएच्या अंतिम वर्षातील एकूण २९६ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. यामधून जेबीएल इंडिया लि. कंपनीने इंजिनिअरिंग मधून २४ विद्यार्थ्यांची, डिप्लोमा मधून ३६ विद्यार्थ्यांची व एमबीए मधून ४ विद्यार्थ्यांची निवड केली . तसेच टाटा स्ट्राइव्ह या कंपनीने इंजिनिअरिंग मधून २९ विद्यार्थ्यांची, डिप्लोमा मधून ५८ विद्यार्थ्यांची व एमबीए मधून ११ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाख ते ८.५० लाखाचे पॅकेज मिळाले आहे.
आडसूळ टेक्निकल कॅम्पचे अध्यक्ष मा प्रा.श्री अनिरुद्ध आडसूळ, प्राचार्य व संचालक डॉ. प्रदीप एम पाटील, जेबीएल इंडियाचे एच आर मा. श्री राहुल पाटील, टाटा स्ट्राइव्हचे एच आर मा. श्री सुबोध जाधव आदी मान्यवर आणि निवड झालेले विद्यार्थी
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ, उपाध्यक्ष मा. श्री विश्वनाथ माणिक आडसूळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रदीप एम पाटील, उप प्राचार्य श्री किशोर जाधव, आडसूळ तंत्रनिकेतनचे प्राचार्य गडाख आर एस ,संगणक विभाग प्रमुख डॉ.हेमंत जाधव, एम.बी.ए विभाग प्रमुख प्रा.सुहास पाखरे, इलेक्ट्रॉनिक विभाग प्रमुख डॉ.दिनेश अडोकर, डॉ.विश्वजित कांबळे ,डॉ.धन्यकुमार जैन, डॉ. गणेश शिरसाट, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. रमेश काकडे यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन व सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार एमबीए विभाग प्रमुख प्रा.सुहास पाखरे यांनी मानले.

