निमसाखर गावचे सुपुत्र जवान महेश पोपट जाधव यांचा सेवापूर्ती समारंभ झाला मोठ्या थाटामाटात.
निमसाखर गावच्या ग्रामस्थांनी व मित्रपरिवारांनी सेवानिवृत्त सैनिक महेश जाधव यांचा घोड्यावरती मिरवणूक काढून केला सत्कार .
इंदापूर प्रतिनिधी:निमसाखर गावचे सुपुत्र जवान महेश पोपट जाधव यांचा निमसाखर ग्रामस्थ व मित्रपरिवार यांच्या वतीने दिनांक २ नोव्हेंबर २०२२ रोजी इंडियन आर्मी मधून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सेवापूर्ती समारंभ करण्यात आला. यावेळी देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या महेश जाधव यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा घोड्यावरती मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.
महेश पोपट जाधव यांनी इयत्ता बारावी पास झाल्यानंतर १७ ऑक्टोबर २००५ साली आर्मीमध्ये क्रॉप्स ऑफ सिग्नल्स या खात्यात ऑपरेटर म्हणून सैन्यात भरती झाले. त्यांनी सेवा बजावत असताना उदमपूर ,बिकानेर, पुंछ, राजोरी , नंगधार, श्रीनगर व पुणे येथे त्यांनी आपली सेवा बजावली. ऑक्टोबर २०२२ मध्ये १७ वर्षाची सेवा देऊन ते सेवानिवृत्त झाले.
सत्कार व सेवापूर्ती समारंभ राजे छत्रपती आजी-माजी सैनिक संघटना वालचंदनगरचे अध्यक्ष पांडुरंग बोंद्रे यांनी महेश जाधव व त्यांच्या परिवारांचा सत्कार केला. कार्यक्रमास दीपक रणवरे, विकास धनवडे, जितेंद्र जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी दिव्यांग असणारे गणेश धनवडे यांनीही देशसेवा करून आलेले महेश जाधव यांचा सत्कार केला.
यावेळी जवान पृथ्वीराज चव्हाण व महेश जाधव यांनी भरती होऊ इच्छिणाऱ्या जवानांना मार्गदर्शन व मदत करण्याचे आश्वासन दिले.

