shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रामीण भागातील गरीब व हुशार विद्यार्थीनींना मिळणार शिष्यवृत्ती ; इंडोफिल चा ' प्रोजेक्ट खुशी ' हा उपक्रम कौतुकास्पद


प्रतिनिधी : आसावरी वायकर

कळस  : ३ /   ग्रामीण भागातील गरीब व हुशार विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती देण्याची इंडोफिल चा प्रोजेक्ट खुशी हा उपक्रम मुलींच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठीची बीजे रोवली आहे असे मत बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.

          कळस येथे भारतातील कृषी क्षेत्रातील इंडोफिल इंडस्ट्रीज कंपनीच्या "प्रोजेक्ट खुशी" चे उदघाटन मा . पोपेरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. कंपनीचे संस्थापक कै. के.के.मोदी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अध्यक्षा डॉ.बिना मोदी यांच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट खुशी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी कळस गावचे सरपंच राजेंद्र गवांदे, बायफ चे विभागीय अधिकारी जतीन साठे, भाजपचे सोशल मिडिया सेलचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, श्रमिक उद्योग समूहाचे अनिल नवले, उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे आदी उपस्थित होते.

       सौ. पोपेरे म्हणाले की,  महिला जर जिवनात शिक्षणाचा आधार घेऊन आजच्या समाजात उभी राहिली तर ती क्रांती करू शकते. मला शिक्षणाचा आधार नव्हता तरी मी मातीशी नाळ जोडली आणि पद्मश्री झाले. कंपनीच्या या उपक्रमाने भारावुन टाकले आपण समाजाप्रती काही तरी देण लागतो हि उदात्त भावना ठेऊन या इंडोफिल कंपनीने स्रीशक्ती एकप्रकारे गौरव केला आहे.  असे पोपेरे यांनी व्यक्त केले.

    इंडोफिल कंपनीचे जनरल मॅनेजर महेश खंबाटे यांनी प्रास्ताविक करताना ग्रामीण भागातील गरीब वंचित तसेच ज्या मुलींना शिकण्याची आवड आहे परंतु आर्थिक परिस्थिती नुसार शिक्षणावर बाधा निर्माण होत असेल अशा मुलींच्या पाठीमागे खंबिरपणे उभे राहुन प्रोजेक्ट खुशीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबवत शिक्षणाचे काम कंपनीच्या व्यावसायिक सामाजिक बांधीलकी  फंडातून केले जात आहे. देशातील पात्र मुलींशी सहयोग साधून खुशी पसरविण्याचे आणि उंच उडण्यासाठी पंख देण्याचे ध्येय आहे.
      कळस चे सरपंच राजेंद्र गवांदे यांनी महाराष्ट्रातील दोन शाळाची निवड करण्यात आली त्यात कळस येथील कळसेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचा समावेश आहे याचा आम्हाला गौरव आहे असे मत व्यक्त केले.  तर देशभर राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा शुभारंभ इंडोफिल कंपनीने कळस सारख्या छोट्या गावातुन केला. यातून ग्रामीण भागा प्रती कंपनी दायित्व दिसून येते. प्रोजेक्ट खुशी या उपक्रमाचा कळस नक्की होईल अकोले तालुक्यात कृषी संस्कृती अगस्ती महाराज यांनी सुरू केली असून ती जोपासना करण्याचे काम इंडोफिल करीत आहे असे मत भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले.

       या कार्यक्रमाचे आयोजन कळस गावचे आदर्श उद्योजक अशोक वाकचौरे, इंडोफिल चे कम्युनिकेशन हेड श्रीमती नम्रता वर्तक,रिजनल डिमांड मँनेजर सागर पगार, टेरेटरी मँनेजर राजेश जाधव, डिमांड एक्सिकेटीव्ह हेड किशोर लोहार शेतकरी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शालेय उपयोगाचे साहीत्य वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता दिघे, सौ नंदा बिबवे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन मच्छिंद्र साळुंके यांनी केले.
close