नगर :-आज ऐतिहासिक अहमदनगर शहरातील खुप वर्षा पासून प्रलंबित प्रश्न म्हणजे नगरचा उड्डाणपूल आज मा. नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांच्या हस्ते अखेर रखडलेल्या उड्डाणपूल पुलाचे शेवटचे उद्घाटन संपन्न झाले.आजच्या कार्यक्रमात अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री विखे पाटील यांनी स्वर्ग.माजी आमदार अनिल भैय्या नाम उल्लेख राहिला होता परंतु आठवणी ने त्यांचा आवर्जून नाम उल्लेख केला.
या उड्डाणपूलाचे वात पेटण्याचे काम प्रथम त्यांनी केले होते. त्यांनी तीन दिवस उपोषण देखील केल्याचे नगरकर आवर्जुन सांगत होते. त्यानंतर स्व.मा.खासदार दिलीप गांधी यांनी या उड्डाणपूल साठी मोठा पाठपुरावा केला होता. त्यांचे एक जिवंत उदाहरण अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड मध्ये या नगर उड्डाणपूल उद्घाटन मा.केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या आँनलाईन भुमीपुजनाचा कार्यक्रम पार पडला होता.
या नगर शहराच्या उड्डाणपूल साठी दोन पोते नारळ फोडण्यात आले होते. आज अखेर रखडलेल्या उड्डाणपूल अनेक घडामोडी नंतर उड्डाणपूल उद्घाटन पार पडले. उद्या पासून नगरकरांना उड्डाणपूल खुला करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमा साठी राजकीय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी सकाळ पासून कार्यरत होते.
पोलिस प्रशासन चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

