जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धाराशिव :- भूम, परंडा व वाशी मतदारसंघातील नागरिकांसाठी 27 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'महाआरोग्य शिबीर' कोटला मैदान, परंडा येथील नियोजित कार्यक्रम स्थळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी भेट देऊन तयारीची पाहणी केली.
मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात आयोजित या महाआरोग्य शिबिरासाठी धाराशिव जिल्हा व परिसरातील नागरिकांची प्रचंड मोठी उपस्थिती असणार आहे.
या शिबिरामध्ये दुर्धर व गंभीर आजारांची तपासणी व औषधोपचार मोफत केला जाणार आहे.
कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा दुर्धर अथवा गंभीर आजार असेल, हृदयरोग, किडनीचे आजार, कॅन्सर, डोळ्यांचे आजार, गर्भाशयाचे आजार, कानाचे आजार, पोटाचे आजार, संधीवात अशा कुठल्याही आजाराबाबत या शिबिरात उपचार केले जाणार आहेत.
महाआरोग्य शिबिराच्या दिवशी प्रत्येक रुग्णाला तपासणीच्या सुविधा सुलभपणे मिळतील असे नियोजन करावे. या शिबिराची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. शिबीरात पिण्याचे पाणी, 24 तास वीज, रुग्णवाहिका, पोलीस प्रशासन व्यवस्था, आवश्यक मनुष्यबळ, शिबिराच्या ठिकाणी स्वच्छता इ. सोयींच्या बाबत सूचना मंत्री महोदयांनी केल्या.
या शिबिराच्या लाभापासून कोणताही रुग्ण वंचीत राहता काम नये. या शिबिराचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त रूग्णांचा लाभ घेता यावा यासाठी सर्व शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या समन्वय बैठका घेऊन मार्गदर्शन करावे अश्या सूचना मंत्री महोदयांनी यावेळी दिल्या.
महाआरोग्य शिबिरात राज्यासह देशभरातील नामवंत चिकित्सक सहभागी होणार आहेत. त्यामुळे या तपासणी मोहिमेचा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी मंत्री सावंत यांनी केले.

