यावेळी उद्घाटन झाल्यानंतर कबड्डी स्पर्धेमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी सहभागी होऊन कबड्डीचा खेळ खेळला. यावेळी कबड्डी खेळत असताना दोन गडी बाद ही केले. यावेळी सर्व मुला-मुलींना प्रोत्साहन म्हणून आमदार भरणे हे स्वतः राजकीय मैदानात रोजच खेळत असतात. आज त्यांनी मुलांबरोबर कबड्डी खेळण्याचा आनंद घेतला.
यावेळी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत बनसोडे, उपाध्यक्ष डॉक्टर शितल कुमार शहा, कार्याध्यक्ष नंदाताई बनसोडे, पंचायत समिती सदस्य प्रदीप काळे, पळसदेव चे सरपंच इंद्रायणी मोरे, उपसरपंच कैलास भोसले तसेच आजी-माजी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

