shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एन. ई. एस हायस्कूल व जुनिअर कॉलेज निमसाखर येथे सर्प जनजागृती कार्यक्रम संपन्न.

एन. ई. एस हायस्कूल व जुनिअर कॉलेज निमसाखर येथे सर्प जनजागृती कार्यक्रम संपन्न.
 इंदापूर प्रतिनिधी: वन्यजीव संरक्षक संस्था इंदापूर 
यांच्या विद्यमाने  शनिवार दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी एन. ई. एस हायस्कूल व जुनिअर कॉलेज निमसाखर येथे सर्प जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.काही क्षणचित्रे दाखून कार्यक्रमांमध्ये सापाबद्दल असलेले गैरसमज तसेच आपल्या भागातील साप विषारी बिनविषारी व साप चावल्यानंतर करावयाचा प्रथम उपचार, मुलांच्या मनामध्ये सापाबद्दल असलेले प्रश्न त्याची उत्तरे त्यांना समजून सांगण्यात आली.
यावेळेस वन्यजीव अभ्यासक श्री कीर्तीकुमार लोंढे वन्यजीव संरक्षक संस्थेचे उपाध्यक्ष श्री अमित अडसूळ,
विकास सोनवणे, राज गाडे तसेच शाळेचे प्राचार्य श्री चंद्रकांत रणवरे शिक्षक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते
close