विक्रम बप्पा मुंडेंना माजी मंत्री पंकजा मुंडेंनी दिल्या अमृत मोहत्वाच्या शुभेच्छा
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रति निधी :-
राजकीय,सामाजीक,शैक्षणीक,आर्थिक क्षेत्रात विक्रम बप्पा मुंडे यांचा स्वतंत्र दबदबा आहे.त्यांच्या अमृत मोहत्सवाचा कार्यक्रम रद्द केल्याने मला शुभेच्छा देण्यासाठी येता आले नाही.परंतू आज केजला आल्यानंतर शुभेच्छा देण्याचा मोह मला आवरता आला नाही.त्यामुळे आज याठीकाणी बप्पांना अमृत मोहत्सवाच्या शुभेच्छा देत आहे.विक्रम बप्पांचा सर्वच क्षेत्रात स्वतंत्र दबदबा आसल्याने आपण त्यांना पक्षाच्या चौकटीत बसवत नाहीत.परंतू त्यांचे आणी माझे स्नेह कायम आसल्याचे प्रतिपादन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले
केज तालुक्यातील देवगाव येथे माजी ग्रामविकास मंत्री तथा भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई गोपिनाथरावजी मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे,यांच्या निवास्थानी सदिच्छ भेट देऊण अमृत मोहत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.दरम्यान पिकविमा व अतिवृष्टीचे अनुदान तातडीने देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करणार,विडा प्रा.आरोग्य केंद्राला ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळावा तसेच सारूळ येथिल १३२ केव्ही उपकेंद्रासाठी प्रयत्न करणार आसल्याचे प्रतिपादन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
प्रसंगी विडा गटाचे जि.प.सदस्य विजयकांत मुंडे,देवगावचे सरपंच अतुल मुंडे,प्रा.माधुरीताई मुंडे,रूपालीताई मुंडे यांनी औक्षण करून कुटुंबियांच्या वतिने सत्कार केला.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,जि.प.सदस्य संतोष हांगे,भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,वैद्यकीय आघाडीचे जिल्हा आध्यक्ष डाॅ.वसुदेव नेहरकर,केज पंचायत समितीचे सभापती विष्णु घुले,माजी सभापती संदीप पाटील,मुरलीधर ढाकणे,कोरडेवाडीचे सरपंच बाबासाहेब कोरडे,लिंबाचिवाडीचे सरपंच राजेभाऊ हाराळे,पिराचिवाडीचे सरपंच बाळासाहेब कराड,आंधळेवाडीचे सरपंच नामदेव आंधळे,दहिफळचे उपसरपंच बालासाहेब मोराळे,काशिदवाडीचे माजी सरपंच महादेव जाधवर विड्याचे ग्रा.पं.सदस्य डाॅ.धनराज पवार,कोरडेवाडीचे ग्रा.पं.सदस्य दत्ता गित्ते,दत्ता राख,पिंपळगावचे शेतिनिष्ठ शेतकरी सहदेव घोळवे,प्रा.उध्दव घोळवे,दादाराव आंधळे,बारीकराव भोसले,विठ्ठल भोसले,बप्पा बर्दापुरकर,राजेंद्र देशमुख,अंकुश जोगदंडपत्रकार अशोक भोसले यांच्यासह विडा जि.प.गटातील विविध गावचे सरपंच,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमण,भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


