shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तक्षिला स्कूलच्या जागृती बागलचे शालेय स्केटिंगमधे घवघवीत यश


प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : 28 /   तालुका क्रीड़ा संकुल, संगमनेर येथे जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे व कोविड प्रादुर्भावामुळे  दोन वर्ष मैदाना पासून वंचित राहिलेल्या खेळाडूंना या वर्षी होणार्‍या या शालेय स्पर्धांमुळे आनंद झाला .

 तक्षिला स्कूल, अहमदनगर च्या कु.जागृती महेश बागल हिने दि . 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत अत्यंत जिद्दीने व चिकाटीने कडवी झुंज देत स्केटिंग खेळातील स्पीड प्रकारात रिंग 1(300) मीटर, रिंग 2 (500) मीटर, रोड 1 (750) मीटर व रोड 2 (1000) मीटर  या रेस प्रकारात चार सुवर्णपदके पटकावुन आपली निवड आगामी होणार्‍या पुणे विभागीय स्पर्धेत निश्चित केली.

 तिच्या या यशाबद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.  तक्षिला स्कूलच्या प्राचार्या मा. जयश्री मेहेत्रे मॅडम यांनी अभिनंदन करून आगामी होणार्‍या स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या .

 जागृतीला शाळेतील क्रीड़ा शिक्षक श्री. प्रदीप पाटोळे, श्री. जावेद शेख व प्राजक्ता आठरे यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच शाळेच्या सर्व शिक्षक वृंद यांनी शुभेच्छा दिल्या.
close