shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रत्नाई कृषी महाविदयालयाच्या कृषीकन्यांकडून शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे मार्गदर्शन

रत्नाई कृषी महाविदयालयाच्या कृषीकन्यांकडून शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे मार्गदर्शन
 इंदापूर प्रतिनिधी:   विझोरी (ता. माळशिरस) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविदयालयातील कृषीकन्यांद्वारे शेतकयांना माती परीक्षणाचे मार्गदर्शन करण्यात आले.

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, रत्नाई कृषी महाविदयालयाचे प्राचार्य आर .जी.नलावडे, प्रा. एस. एम. एकतपूरे (कार्यक्रम समन्वयक) व प्राध्यापक एस. आर. आडत यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीकन्या काजल गोरख भोसले, रत्नप्रभा दिपकराव धाईजे, श्रुती दत्तात्रय काळे, नाज मुबारक अतार, मनिषा विलास दगडे ,प्रतिभा अरुण डांगे, वैष्णवी वैभव बर्वे यांनी विझोरी या ठिकाणी माती परीक्षण बद्दल लोकांमध्ये जनजागृती केली .चांगली माती हा शेतीचा मुख्य घटक आहे. मातीचे आरोग्य चांगले तर तयार होणाऱ्या पिकांची गुणवत्ता उत्तम म्हणून मातीत असणाऱ्या अन्नघटकांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे .माती परीक्षणाचा मुळ उद्देश हा जमिनीतील पिकवाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची (नत्र, सेंद्रिय, कर्ब, स्फुरद, पालाश सामू इ. ) कमतरता भरून काढण्यासाठी काय आवश्यक आहे आणि त्यासाठी मातीमध्ये काय व किती प्रमाणात मिसळले पाहिजे याबाबत लोकांना माहिती दिली .तसेच मातीचा नमुना कसा घ्यावा त्याचे ठिकाण पद्धती याबाबत लोकांना माहिती दिली मातीची उत्पादकता सुधारण्यासाठी करावयाचे उपाय, आवश्यक अन्नघटक व त्याच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे याविषयी शेतकरी ज्ञानदेव शिंदे, शंकर काळे, धनाजी काळे व इतर शेतकरी यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन केले .माती परीक्षण करून आवश्यक तेवढ्याच रासायनिक खतांचा वापर केला तर जमिनीची नापीकता कमी होऊन जमिनीची सुपिकता वाढेल. अशा रितीने कृषीकन्यांनी माती परीक्षणाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले.
close