shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेजपृथ्वी ग्रूपच्या अध्यक्षा अनिताताई नानासाहेब खरात यांची एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदच्या इंदापूर तालुका महिला संघटक पदी नियुक्ती.

 तेजपृथ्वी ग्रूपच्या अध्यक्षा अनिताताई नानासाहेब खरात यांची एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदच्या  इंदापूर तालुका महिला संघटक पदी नियुक्ती.

पुणे येथे केंद्रीय राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग खा.डॉ.भारतीताई पवार व एमआयटी-पुणे शिक्षणसंस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांच्या हस्ते अनिताताई खरात यांना दिले नियुक्तीपत्र.
इंदापूर प्रतिनिधी: दि.१९ नोव्हें.२०२२ रोजी पुणे येथे एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य अधिवेशन पार पडले.यावेळी राज्यसभा खासदार व केंद्रीय राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग डॉ.भारतीताई पवार व एमआयटी-पुणे शिक्षणसंस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड,योगेश पाटील प्रमुख राष्ट्रीय सरपंच संसद, या प्रमुखांच्या उपस्थितीत तेजपृथ्वी ग्रूपच्या  संस्थापक अध्यक्षा अनिताताई नानासाहेब खरात यांना एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुका महिला संघटक या पदाची जबाबदार देण्यात आली. तसे नियुक्तीपत्र भारतीताई पवार व राहुल कराड यांच्या हस्ते अनिताताई खरात यांना देण्यात आले. 

यावेळी मनोगत व्यक्त करताना अनिताताई खरात म्हणाल्या की, देशाच्या शाश्वत व सर्वांगीण ग्रामविकास प्रक्रियेत पंचायत राज व्यवस्थेचे मोठे योगदान आहे. देशाच्या पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे अराजकीय स्वरूपात संघटन करणे, त्यांचे प्रबोधन करणे, विविध उपक्रमांचे अभ्यासपूर्ण संयोजन करून त्यांना ग्रामविकास प्रक्रियेत सहकार्य करणे हे एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या उद्दिष्ट्यपुर्तीसाठी मी माझा अनुभव, संघटन कौशल्य व सामाजिक योगदान याचा उपयोग करणार आहे. तेजपृथ्वी ग्रुपच्या तसेच इंदापूर तालुका महिला दक्षता समितीच्या माध्यमातून सामाजिक काम करत असताना मी जातीभेद न करता गोरगरीब, कष्टकरी,शेतकरी, विद्यार्थी यांना न्याय देण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे आणि आज मला आपण आपल्या राष्ट्रीय सरपंच संसद परिषदे वरती जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेल. यासाठी माझे पती नानासाहेब खरात यांचे मला कायम सहकार्य व पाठिंबा लाभला आहे. आजपासून माझी जबाबदारी निश्चितपणे वाढली आहे. मी एमआयटी शिक्षण समूहाचे व राष्ट्रीय सरपंच संसद परिषदेचे मनापासून आभार मानते. इंदापूर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती पांडुरंग मारकड व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांनी या निवडीबद्दल अनीताताई खरात यांचे अभिनंदन केले आहे. अनीताताई खरात यांना या पुर्वीही त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यानिमित्त सर्व स्तरातून त्यांच्या वरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
close