shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साखर कारखान्यांची काजळी एक भयान प्रदूषण..! तरी प्रशासन आणि सारेच गप्प...?

महाराष्ट्रात साखर कारखानदार स्वतःला साखर सम्राट म्हणवून घेतात....?

प्रत्येक साखर कारखान्यात एका सरंजामाची पिढीजात सत्ता...?


प्रत्येक साखर कारखान्यातील साखर निर्मिती साठी उर्जा निर्माण करण्यासाठी भूसा जाळला जातो... हा भूसा जळाल्यानंतर हवेत राख उडू नये म्हणून स्क्रबर बसवले जातात... पण साखर कारखानदार तो चालू ठेवत नाही..
ह्या राखेची काजळी परीसरात हवेच्या झोतात पाच ते सात किलोमीटर पर्यंत प्रवास करते.. पिकांवर पडल्यानंतर पिकाचे बाजारमुल्य कमी होते... पाळीव जनावरांच्या आरोग्याची हानी होते... गृहिणीने अंगणात वाळत घातलेले वाळवण, भांडी ,कपडे खराब होतात...

प्रत्येक कारखाना परिसरात असलेल्या कर्मचारी वसाहतीत राहणारे नागरिक व परिसरात असलेल्या शैक्षणिक संकुल मधील विद्यार्थी ह्या काजळीचे शिकार ठरतात व दिर्घकाल श्वसन रोग जडतात.. ह्या कारखाना परिसरातील रस्त्याने प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वाराच्या डोळ्यात काजळी जाते व ती काढून घेण्यासाठी नागरिकांना नेत्र तज्ञांना भेट देऊन दोन दिवस डोळ्याला पट्टी ठेवावी लागते.

साखर कारखानदार प्रत्येक कार्यालयात साखर पेरणी दरवर्षी न चुकता करतात.. त्यामुळे कुठलाही सरकारी अधिकारी कारवाई करीत नाही... देशात व ग्रामीण भागात प्रदूषण वाढवणाऱ्या ह्या साखर कारखान्यांना शासन अनुदान देते... पण प्रदूषण मात्र वाढत आहे... तथाकथित साखर सम्राट साम दाम दंड भेद वापरून सर्वांचे तोंडे बंद करतात... पाकिटे हा यांचा परावलीचा शब्द...!


जनतेला व निसर्गाचा प्रदूषण करून छळ करणाऱ्या साखर कारखान्यावर शासनाची पण कारवाई करण्याची धमक नाही ... कारण हे सरकार गडगडाण्याची ताकद ठेवतात...

पण जनतेची हाल किती दिवस करणार ... शासकीय अधिकारी ह्यांच्या उष्टळीवर किती दिवस लोंडा घोळणार.. शासन संख्याबळासाठी किती दिवस धृतराष्ट्र व गांधारी होणार...?

सामाजिक कार्यकर्ते..
संजय भास्करराव काळे
कोपरगाव.

close