यशवंतराव चव्हाण सेंटर इंदापूर यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त आशा सेविकांबरोबर विधी संवाद साधत केले मार्गदर्शन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर पंचायत समिती अल्पबचत सभागृह या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सेंटर इंदापूर - कौटुंबिक समस्या समुपदेशन ,कायदेशिर मदत व मार्गदर्शन केंद्र इंदापूर यांच्यावतीने
संविधान दिनानिमीत्त संविधान उद्देशिका याचे वाचन करून उपस्थित आशा सेविकांबरोबर विधी संवाद साधत मार्गदर्शन दि.२५ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या कार्याअध्यक्षा खासदार सौ .सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण सेंटर इंदापूर - कौटुंबिक समस्या समुपदेशन ,कायदेशिर मदत व मार्गदर्शन केंद्र इंदापूर याठिकाणी गेले तीन महिने झाले सूरू करण्यात आले आहे ."विश्वासर्ह सर्वोत्तम सेवा " हे त्याचे ब्रिद आहे . हि संकल्पना तळागाळातील महिलां पर्यत पोहचावी व सर्व महिलांच्या समस्येचे निवारण व्हावे ह्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या तालुका अध्यक्षा श्रीमती छायाताई पडसळकर ,उपाअध्यक्षा रेहणा मुलाणी , अॅड .किरण धापटे यानी हा केला. महिलांना मार्गद्शनासाठी विषय भारतिय संविधान ,महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासुन संरक्षण ,फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५(पोटगी) यासंदर्भात मार्गदर्शन अॅड. तेजल वीर मॅडम ,अॅड. अंजली दास -शिंदे,अॅड. अशितोष भोसले ,अॅड.किरण मेहता यांनी तालुक्यातील सर्व आशा सेविका यांना विधी संवाद साधत मार्गदर्शन केले .

