shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथील महाराष्ट्र केसरी निवड चाचणी ६५ वे अधिवेशन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने इंदापूर तालुका तालीम निवड चाचणी स्पर्धेत २० मल्ल जिल्हास्तरीय निवड चाचणी साठी पात्र.

इंदापूर येथील महाराष्ट्र केसरी निवड चाचणी ६५ वे अधिवेशन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने इंदापूर तालुका तालीम निवड चाचणी स्पर्धेत २० मल्ल जिल्हास्तरीय निवड चाचणी साठी पात्र.
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र केसरी निवड चाचणी ६५ वे अधिवेशन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने इंदापूर तालुका तालीम निवड चाचणी स्पर्धा २०२२ मोठया उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी विविध वजन गटातून माती व गादी अशा दोन्ही विभागातून २० मल्ल जिल्हास्तरीय निवड चाचणी साठी पात्र झाले.
     इंदापूर नगरपालिकेसमोरील मैदानावर पै. विजय शिंदे व इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे यांच्या प्रयत्नातून आयोजित तालुकास्तरीय निवड चाचणी प्रसंगी माजी राज्यमंत्री आ.दत्तात्रय भरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी पै.राहुल आवारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,  पुणे जिल्हा परिषदचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा,पै.प्रदीप जगदाळे, गटनेते कैलास कदम, अमर गाडे, स्वप्नील राऊत, अनिकेत वाघ, राहुल गुंडेकर, पै.असलम काझी,अतुल पाटील,  रावसाहेब मगर, हे मान्यवर उपस्थित होते.
      या स्पर्धेमधून विजयी खेळाडू हे पुणे जिल्हा निवड चाचणी स्पर्धेसाठी निवडण्यात आले.यावेळी इंदापूर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पै.मारुती मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी पार पडल्या.उपाध्यक्ष राजेंद्र चोरमले, सचिव शरद झोळ, खजिनदार दत्तात्रय जाधव,पै.कमाल जमादार,सचिन बनकर, सचिन चांदणे,परशुराम करगळ, भारत जाधव तसेच कुस्तीप्रेमी वस्ताद पै.नवनाथ तरंगे, पै.पांडुरंग राऊत,पै.सोनबा गिरी, पै.असलम मुलानी, पै.अशोक चोरमले, पै.शशिकांत सोनार, हनुमंत पवार तर पंच म्हणून मोहन खोपडे, शरद झोळ पप्पू कालेकर, निलेश मारणे, अनिल तरंगे अशोक करे, सागर नरळे, सागर मारकड,अशोक बंडगर यांनी काम पाहिले.

३५० कुस्तीगीरांचा सहभाग
     या निवड स्पर्धेमध्ये एकूण साडेतीनशे कुस्तीगिरांनी सहभाग नोंदवला. दोन्ही बाजूला प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरी तसेच एक माती आखाडा व मॅट यासह योग्य नियोजन यामुळे इंदापूर तालुक्यातील कुस्तीप्रेमींनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित लावली.
वजन गट - गादी विभाग विजेता - माती विभाग विजेता
५७ किलो - ज्ञानेश्वर शिंदे - सौरभ वाघमोडे
६१ किलो - मिलिंद हरणावळ - कृष्णा हरणावळ
६५ किलो - योगेश कांबळे - कुणाल नलवडे
७० किलो - राजू भोंग - अनिल कचरे
७४ किलो - रणजीत जाधव - अक्षय मारकड
७९ किलो - ऋषिकेश काळेल - भोजराज काळेल
८६ किलो - सागर शिंदे - अविनाश गावडे
९२ किलो - अभीजीत शेंडे - मामासाहेब तरंगे
९७ किलो - संभाजी डांगे - तेजस काळेल
१३० किलो - संग्राम शिंदे - मनीष रायते
close