जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत महात्मा फुले यांचा स्मृतिदिन साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी जि.प. प्राथमिक शाळा कौठळी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मृतिदिन साजरी करण्यात आली.प्रथम शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.नंतर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड मॅडम यांनी मुलांना महात्मा फुले यांच्या कार्याची थोडक्यात माहिती सांगितली.नंतर मुलांनी आपले विचार व्यक्त केले.महात्मा फुले स्मृतिदिना निमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.यशस्वी मुलांचे कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी, उपशिक्षक भारत ननवरे,आरती गायकवाड यांनी केले.

