जिल्हा परिषदेच्या लुमेवाडी शाळेतील मुलांना जे .बी. व्ही. पी. प्रतिष्ठान कडून मोफत स्पोर्ट गणवेश.
जे बी व्ही पी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री श्रीमंत ढोले यांचा स्तुत्य उपक्रम.
इंदापूर प्रतिनिधी: जिल्हा परिषदेच्या लुमेवाडी शाळेतील मुलांनी यशवंतराव चव्हाण कला/क्रीडा तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये उत्तुंग यश मिळवले.कबड्डी,गोळा फेक,थाळी फेक अशा अनेक क्रीडा प्रकारात लुमेवाडी शाळेतील मुलांनी बाजी मारली व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. जिल्हा परिषदेच्या शाळेतील गोरगरीब मुलांनी मिळवलेले यश पाहून जे बी व्ही पी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी खेळातील सर्व मुलांना प्रतिष्ठान च्या वतीने मोफत स्पोर्ट गणवेश वाटप केले.त्यांच्या या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण व सर्व शिक्षकांनी स्वागत केले व शाळेच्या वतीने आभार मानले.त्यांच्या या उपक्रमाचे लुमेवाडी शाळा व परिसरातून कौतुक होत असल्याची माहिती लुमेवाडी शाळेचे पदवीधर शिक्षक योगेश पांढरे यांनी दिली.

