shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमसाखर येथील एन. ई. एस. हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी विशाल ओव्हाळ याचीइंदापूर तालुका कुस्ती स्पर्धातून जिल्हा पातळीवर निवड.

निमसाखर येथील एन. ई. एस. हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी विशाल ओव्हाळ याचीइंदापूर तालुका कुस्ती स्पर्धातून जिल्हा पातळीवर निवड.

 प्रकाश नवनाथ कोळेकर
 याने ८६ किलो वजन गटात प्रथम क्रमांक  तर  सार्थक दत्तात्रय  जाधव   ५७ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवला.
इंदापूर प्रतिनिधी: पुणे जिल्हा परिषद पुणे व पुणे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने इंदापूर तालुका कुस्ती स्पर्धा मारकड कुस्ती केंद्र इंदापूर या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या. यामध्ये एन. ई. एस. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज निमसाखर तालुका इंदापूर येथील विद्यार्थी ओव्हाळ विशाल सुभाष इयत्ता बारावी याने ९७ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. कोळेकर प्रकाश नवनाथ इयत्ता अकरावी याने ८६ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला तर जाधव सार्थक दत्तात्रेय यांनी ५७ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवला. यापैकी प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी ओव्हाळ विशाल सुभाष याची जिल्हा पातळीवर निवड झालेली आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यकांत रणवरे, स्कूल कमिटीचे चेअरमन विजयसिंह पांडुरंग रणवरे, संस्था उपाध्यक्ष संजय रणवरे, यशवंत विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन नंदकुमार रणवरे ,संस्था सचिव धनंजय रणवरे, प्राचार्य चंद्रकांत रनवरे, पर्यवेक्षक मधुकर खरात, ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे, सूर्यकांत किसवे, क्रीडा शिक्षक सिकंदर मुलानी व वैभव हनुमंते शिक्षक कर्मचारी यांनी सर्व यशस्वी खेळाडूचे अभिनंदन केले.
close