एम ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी.
इंदापूर प्रतिनिधी: एम ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी संस्था सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे, प्राचार्य चंद्रकांत रणवरे सर ,पर्यवेक्षक मधुकर खरात यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था मार्फत घेण्यात आलेल्या चित्रकला परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला. त्यावेळी विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आली. सोमनाथ चौधरी सर यांनी महात्मा फुले यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील मुलांनी व मुलींनी बालविवाह या विषयावर सुंदर पथनाट्य सादर केले. तर रवी पवार व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी बालमजूर, बालविवाह ,गुड टच, बॅड टच, महिलावर होणारे अन्याय अत्याचार याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिनाथ मालगुडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद चव्हाण सर यांनी मानले.

