shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नांदगाव येथे आज खंडोबा महाराज यात्रोत्सव..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                      मंगळवार दिनांक २९ ऑक्टोंबर २०२२

नांदगाव येथे आज खंडोबा महाराज यात्रोत्सव..!!
 
अहमदनगर :  तालुक्यातील नांदगाव येथे सालाबादप्रमाणे यावर्षी चंपाषष्ठी निमित्त खंडोबा महाराज यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे 9 वर्षापूर्वी या गावात खंडोबा महाराज मंदिराची स्थापना झाली तेव्हा पासून आज पर्यंत गावकऱ्यांनी ही परंपरा जपली आहे.
         आज मंगळवार ता. 29 नोव्हेंबर रोजी हा यात्रोत्सव संपन्न होत आहे अशी माहिती गावकरी श्री. सतीश सोनवणे यांनी दिली. यानिमित्त आज मंगळवार  29 नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाभिषेक यानंतर सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत देवाची काठीची सवाद्य मिरवणुक , सायंकाळी सात वाजता महाआरती आणि सायंकाळी ७ ते  आपल्या आगमनापर्यंत महाप्रसाद चा कार्यक्रम आणि संध्याकाळी १० वाजता जागरण गोंधळ च्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. 
       तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिव मल्हार मित्र मंडळ , हनुमान मित्र मंडळ , तसेच ग्रामस्थ नांदगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close