shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौराईमळा(शेळगाव) शाळेत सी वाय डी ए या सामाजिक संस्थेकडुन पुस्तक वाटप.

गौराईमळा शाळेत सी वाय डी ए या सामाजिक संस्थेकडुन पुस्तक वाटप.
 इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २८ नोव्हेंबर२०२२ रोजी  जि प प्रा शाळा गौराईमळा (शेळगाव) या शाळेत सी वाय डी ए या सामाजिक संस्थेकडुन प्राज फाऊडेशनच्या  संयुक्त विद्यमाने मुलभुत अध्ययन क्षमता विकसन या अंतर्गत भाषा,गणित व इंग्रजी या विषयांची अध्ययन क्षमता विकसित व्हावी या अनुशंगाने सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करुन पालकांना या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले.
     प्रथम महात्मा फुले यांच्या स्मृतीदिना निमित्ताने प्रतिमा पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. आपल्या तालुक्यात सी वाय डी ए यांच्यावतीने, सन्माननीय गटविकास अधिकारी परीट , गट शिक्षण अधिकारी  बामणे  यांच्या संकल्पनेतुन या संस्थेमार्फत हा उपक्रम आपल्या तालुक्यात  ५० शाळांमध्ये सुरु आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा निश्रितच फायदा होणार असुन तालुक्याला एक वेगळी दिशा यातुन मिळणार आहे 
                  या वेळी प्रास्ताविक   अमर हजारे सर व मनोगत केंद्र प्रमुख  मारुती सुपुते  मुख्याध्यापक प्रताप शिरसट व सी वाय डी ए  चे  मार्गदर्शक गुरव सर यांनी व्यक्त केली. या वेळी ग्रामपंचायत सदस्या प्रियांका जाधव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या रंजना बनसोडे ,राजु शेख सी वाय डी ए चे मार्गदर्शक रोहित साळुंखे सर , किरण यादव सर , अमर हजारे सर , अंगणवाडी सेविक सुनिता जाधव उपस़्थितीत होत्या. तर आभार उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी मानले
close