शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):-
२६ नोव्हेंबर ७३ वा संविधान दिन यानिमित्ताने राहता शहरामध्ये संविधान दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने केली . राष्ट्रगीताचे गायन कु . प्रणिता कैलास निकाळे कु . प्रियंका भिमराज निकाळे , कु . गायत्री दिपक सोळंकी , कु .श्रद्धा रावसाहेब निकाळे, कु .आराधना जितेंद्र दिवे , कु .अपेक्षा सुभाष जगताप यांनी केले .
तदनंतर विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले . प्रतिमा पूजनानंतर संविधानाच्या प्रास्ताविकतेचं वाचन कु . गौरी दिलीपराव खरात हिने केले . भारतीय संविधानावर गणेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ , गणेश सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक ॲड . रघुनाथजी बोठे , मनसेचे विजयराव मोगले ,मोहनराव सदाफळ , भागुनाथ गाडेकर , माजी नगरसेविका नीलमताई सोळंकी , साहेबराव निधाने , संजय सदाफळ , मनोहर बोरुडे सर इ . मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा . राजेंद्र निकाळे यांनी केले . यावेळी राहता नगर परिषदेचे चीप ऑफिसर तुषार आहेर , कृषी उत्पन्न समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर , सोसायटीचे चेअरमन सुरेशराव गाडेकर , धनंजय गाडेकर , माजी नगरसेवक भिमराज निकाळे , प्रदीप बनसोडे , गणेश निकाळे , राजेंद्र पाळंदे , वसंतराव थोरात , वसंतराव खरात , नंदू आरणे इ . मान्यवर उपस्थित होते .
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक भिमराज निकाळे , जितेंद्र दिवे , रावसाहेब निकाळे , अंकुश निकाळे , स्वराज् निकाळे , विकी निकाळे इ . युवक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले .

