shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१४ लाखाची बॅग घेऊन पलायन केलेला माजी उपसरपंच अखेर पोलिसांच्या ताब्यात


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा : दि. २/ : करमाळा शहरातील पूनम जनरल स्टोअर्सचे मालक सुशील कात्रेला यांची १४ लाख रुपयांची बॅग घेऊन पलायन केलेला संशयित आरोपी अखेर करमाळा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.  गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस त्याच्या मागावर होते. वेगवेगळ्या बाजूने तपास करून पोलिसांनी त्याला पकडले आणि अटक केली आहे. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले होते. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

 करमाळा एसटी स्टँड परिसरातून १४ लाख रुपयांची बॅग घेऊन पलायन केल्याप्रकरणी करंजेचे माजी उपसरपंच शरद पवार या संशयित आरोपीविरुद्ध शुक्रवारी २८ ऑक्टोबरला करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास पोलिस हवालदार अजित उबाळे यांच्याकडे होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने त्यांनी तपास केला आणि आरोपीचा शोध घेतला. २७ तारखेला हा प्रकार घडला होता. त्यानंतर २८ तारखेला करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ततपास सुरु केला. मात्र संशयित आरोपीचा मोबाईल बंद होता. त्याचे लोकेशन पनवेल दाखवत होते. मात्र त्यानंतर त्याचा मोबाईल बंद होता. दरम्यानच्या काळात संशयित आरोपीने त्यांच्या बँक खात्यात ५ लाख रुपये जमा केले. संबंधित बँकेत पोलिसांनी तत्काळ धाव घेतली आणि त्याचे तपशील घेतले. पुढे तपास करताना संशयित आरोपीचे गाव करंजे, करमाळा, पुणे अशा विविध ठिकाणी जाऊन चौकशी केली. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा तपास लागला आणि तो सापडला.

संशयित आरोपी हा करमाळ्यातील बायपासला एका हॉटेलजवळ येणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उबाळे यांनी त्याला पकडले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जगताप, पोलिस कॉन्स्टेबल तोफीक काझी, सोमनाथ जगताप आदींनी मदत केली.
close