shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आनाठाई खर्च न करता सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करणारा अनिल पवार एकआदर्श तरुण - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

आनाठाई खर्च न करता सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करणारा अनिल पवार एकआदर्श तरुण  - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. 

इंदापूर येथे अनिल पवार यांचा अभिष्टचिंतन दिन आमचे मेंबर मित्र परिवार यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमातून झाला संपन्न. 

 रक्तदान शिबिरातून ४९३ रक्तपिशव्यांचे झाले संकलन. 
 इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आमचे मेंबर मित्रपरिवार इंदापूर यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर, गरजू व विधवा महिलांना साडी वाटप, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक किट वाटप याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास इंदापूर शहर, तालुका ,माळशिरस ,माढा या तालुक्यातील अनेक युवक वर्ग यांनी उपस्थिती दर्शवून रक्तदान करून शुभेच्छा दिल्या. यावेळी रक्तदात्यांना थंडीमध्ये उपयोगी असणारे  जर्किंग भेट म्हणून देण्यात आले. या शिबिरामध्ये ४९३ रक्ताच्या पिशव्यांचे संकलन झाले.                                    या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थिती दर्शवून अनिल पवार यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अरविंद वाघ, दयानंद इरकल, शकील सय्यद, शेखर पाटील ,अशोक ईजगुडे व इतर मान्यवर उपस्थित होते.     हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, हल्लीचे वाढदिवस धाब्यावर ,बारमध्ये, थंड हवेच्या ठिकाणी होतात. आज तरुण अनिल पवार यांनी एक आदर्श घालून दिला. वाढदिवसा मध्ये आणाठाई खर्च न करता.  सर्वश्रेष्ठ रक्तदान शिबिर घेतले. त्याबद्दल अभिनंदन करतो. आज रक्ताची अत्यंत गरज आहे तसेच गरजू व विधवा महिलांना साडी वाटप करून त्यांना आधार देण्याचे काम अनिल पवार यांनी १०१ महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम घेऊन उपस्थित असणाऱ्या या महिलांना सन्मानित करण्याचे काम अनिल पवार यांनी केलेले आहे. या परिसरातला वडार समाजास स्वर्गीय भाऊंनी त्या काळात राहण्याकरता ७२ साली सरकारी जागा दिली. वडार समाज हा पाटीवर संसार प्रपंच घेऊन फिरत असतो. कष्टाचे, दगड फोडण्याचे व बांधकामाचे काम करतो. या अपेक्षित समाजासाठी राहण्याकरता म्हणून जागा दिली .आता या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून प्रगती होत. नागरी सुविधा झाल्या .नवीन पिढी विकासाच्या प्रवाहात आलेली आहे. अनिल पवार यांच्यासारखा तरुण कार्यकर्ता समाजात निश्चितपणे पुढे येतोय . अनिलआपण काळजी करू नका. तुम्ही सर्वांना जरी बोलवलं असलं तरी सगळ्यात जास्त लक्ष माझं तुझ्यावर राहणार आहे. त्यामुळे काळजी करायची कारण नाही. तुझ्या खांद्यावर हात टाकला म्हणजे तो आशीर्वादाचा हात आहे .तो तुला पुढे नेण्याची शाब्बासकी आहे. तुझ्या आयुष्यात तुला समाजकारण करण्यासाठी म्हणून जी काय भूमिका तुम्ही आणि तुमच्या मित्र परिवाराने स्वीकारले आहे ती भूमिका निश्चितपणाने आम्ही या ठिकाणी पार पाडू .शेवटी आयुष्यात समाजाने आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे.आयुष्यात माणसं पदांने संपत्तीने मोठी होत नाहीत. आठ वर्षे झाली मी कुठल्या पदावर नाही. मी सामान्य कार्यकर्ता आहे. आपण समाजामध्ये वावरतो समाजासाठी काम करतो आणि म्हणून पद येतील जातील. निवडणुका येतील जातील पण आपली तळागाळातील सामाजिक नाळ बांधली गेलेली आहे . अनिल हे नाळ तू तोडू नको. उद्या भविष्यात तू मोठा होणार आहे. पण तळागाळातला संपर्क तो मात्र कमी होता कामा नये. वेळ आल्यावर योग्य पद्धतीने अनिलचा सन्मान राजकीय ,सामाजिक, आर्थिक आणि समाजामध्ये उत्तम पद्धतीने ठेवण्याची जबाबदारी गणपतीच्या साक्षीने या ठिकाणी जाहीर करतो. आणि चांगल्या पद्धतीने काम करूया एवढ्या शुभेच्छा सर्वांच्या वतीने देतो. तसेच पुढे हर्षवर्धन पाटील म्हणाले की, तरुणांनाही आव्हान आहे की, आपणही सामाजिक काम करत असताना. प्रपंचिक कामात चांगले लक्ष द्या.  व्यसनामध्ये पडू नका. या ठिकाणी दयानंद  इरकल वडार समाजासाठी काम करीत असून ते या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच वडार समाजाचे राज्यस्तरावरील जे प्रश्न आहे. समाजाची, आर्थिक, सामाजिक, राजकीय जे प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चितपणाने निवेदन तयार करा. आणि राज्य संघटनेच्या बरोबर बैठक घेऊ व शासन दरबारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या स्तरा वर अनिल तुला निश्चितपणे मदत करण्याची जबाबदारी या हर्षवर्धन पाटील यांनी स्वीकारलेली आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
close