आमचे मेंबर मित्रपरिवाराचे अनिल पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:दि. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आमचे मेंबर मित्रपरिवार इंदापूर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे व गरजू विधवा महिलांना साड्या वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन अनिल पवार यांना शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित गरजू विधवा महिलांना साड्या वाटप विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप आणि रक्तदान शिबिरास भेट दिली. यावेळी त्यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, तालुक्याच्या सर्वांच्या वतीने आमदार या नात्याने अनिल पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अनिल तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो .आपण सामाजिक आरोग्याच्या कामात अग्रेसर असता. लोकांना मदत करता. त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका. माणसांना सगळ्या गोष्टीचे सॉंग करता येते परंतु पैशाचे सोंग करता येत नाही. दवाखान्यांमध्ये गेल्यानंतर पेशंट पेक्षा नातेवाईकांची चेहऱ्यावरून अवस्था काय आहे हे आपण पाहिले आहे. अनिल या गोष्टी अडचणीच्या अवघड असल्या तरी आयुष्यात एक लक्षात ठेवा. जेवढे तुम्हाला लोकांची सेवा करता येईल मदत करता येईल. गरीब माणसांना सहकार्य करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा. राजकारण निवडणूक येतात जातात परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण गोरगरीब माणसांना मदत केली तर तो गरीब माणूस आयुष्यभर विसरत नाही .आपण काम करता. तुम्ही सर्वांना सहकार्य करता. आज गरजू विधवा महिलांना जे साडी वाटप केले त्यांना आधार देण्याचे काम मदत करण्याचे काम अनिल आपण भाऊ या नात्याने त्यांच्या पाठीमागे उभा राहिला या भगिनी तुम्हाला कधीही विसरणार नाहीत. हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना किट वाटप करण्याचे ठरवले त्यामध्ये विद्यार्थीही निश्चित प्रकारे तुम्हाला सहकार्य करतील. यावेळी वडार पॅंथर संघटनेचे अध्यक्ष दयानंद इरकल यांच्या बद्दल बोलताना भरणे म्हणाले की, स्वतःचे ऑपरेशन होऊनही वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावणारे दयानंद इरकल त्यांचे प्रेम पाहून खरंच आनंद वाटला. त्यावेळी त्यांनीही या कार्यक्रमासाठी पुण्याहून आवर्जून उपस्थिती दाखवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, आपल्या अडचणीच्या काळात आपल्याबरोबर जी माणसं असतात ती माणसं आपली असतात .त्यामुळे तू लक्षात ठेव समजणे वाले को इशारा काफी होता है अशा शब्दात त्यांनी आपली मत व्यक्त केले.

