shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कै . सौरभ चौरे यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न ...


रक्तदान शिबिर ही काळची गरज - भैय्या भगत

प्रतिनिधी : संजय वायकर

 नगर : १४  /  कै . सौरभ चौरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निमित दि . १४ नोव्हेंबर रोजी नालेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले . या शिबिरास तरुण युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . 

जनकल्याण रक्तपेढी यांच्या सौजन्याने व डॉ. वसंत झेंडे , जनसंपर्क अधिकारी सागर देवकर , सोशल वर्कर मनिषा जोशी , विनिता धामणगावकर , जनार्दन मडोर , सिस्टर गया चव्हाण , सिस्टर अनिता तरटे , प्रियंका अडागळे यांच्या सहकार्याने सदर रक्तदान शिबिर घेण्यात आले . यावेळी ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले .

यावेळी सामाजिक कार्यकर्ते भैय्या भगत यांनी सांगितले की, रक्तदान शिबिर ही काळाची गरज आहे . सौरभ च्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरा बरोबरच भविष्यात विविध सामाजिक उपक्रम करणार आहोत .

यावेळी सागर मुर्तडक, गणेश शिंदे , ओंकार शिंदे ,अभय खराडे, मनोज औशीकर , शंभु नवसुपे , किरण रोकडे ,राज गोसावी , नितिन जायभाय, परेश खराडे, शुभम धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते .या शिबिरासाठी मायाभाई फ्रेंड सर्कल , वर्चस्व ग्रुप , नालेगाव प्रतिष्ठाण , सातपुते तालीम मित्र मंडळ ,चिंचेचा म्हसोबा मंडळ व सर्व मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले .
close