शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन):-
येथील उर्दू शाळेत आज संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे राज्य कार्यकारणी सदस्य शब्बीरभाई सय्यद ,शिर्डी उर्दू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नासीरभाई।दारुवाले, उपाध्यक्ष हाजी बाबूलाल शेख, सचिव शौकतभाई सय्यद हे होते,यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करून संविधान पउदेशिकाचे वाचन करण्यात आले व त्यानंतर शब्बीरभाई सय्यद यांचे हस्ते भारतीय सविंधानाची प्रत शाळेस भेट म्हणून देण्यात आली.
याप्रसंगी मुख्याध्यापक राजे मोहम्मद मन्सूर पठाण, नियोजद्दीन शेख, इरफान शेख,हसन कुरेशी, अजमत इकबाल उस्मान आदींसह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

