विज्ञान व तंञज्ञानाचा वापर माणसांच्या प्रगतीसाठी व्हावा - डॉ.व्ही.पी.माळी..!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रति निधी :-
देशातील प्रगत तंञज्ञान केवळ प्रयोग शाळेत न रहाता ते प्रत्यक्ष शेतापर्यंत जावुन शेतकरी व सर्व सामान्य माणसांच्या प्रगतीसाठी प्रेरक ठरले पाहिजे.बाहेर देशातील वैज्ञानिक प्रगती,तेथील संस्कृती याचाही अभ्यास केला पाहिजे असे प्रतिपादन उल्हासनगर येथील जे.वाटुमल साधुबेला कॉलेज उल्हासनगर येथील प्राचार्य व सोसायटी आॕफ सायन्स,टेक्नाॕलाॕजी व ह्युमॕनिटी ,कल्याण या संस्थेचे अध्यक्ष डॉ.व्ही.पी.माळी यांनी केले. ते दि.31/10/22 व 1/11/22 रोजी झालेल्या व्हिएतनाम देशातील हो ची मिन्ह सिटी येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद् घाटन करतांना बोलत होते.व्यासपीठावर डॉ.मीरा श्रीवास्तव (बिकानेर,राजस्थान) ,डॉ. जी,एन.शर्मा ,संयोजक डॉ.संदेश वाघ,डॉ.सुभाष चव्हाण
उपस्थित होते.
डॉ.माळी पुढे म्हणाले की या अशा आंतरराष्ट्रीय परिषदेमधुन शोधनिबंधाचे वाचन झाल्यामुळे नव्या संशोधकांना प्रोत्साहन मिळुन पुन्हा या संशोधनात ते प्रगतीचा मार्ग धरु शकतात.
वनस्पतीशास्ञ,प्राणीशास्ञ,जैव रसायन या एकञीकरणामुळे व्यापकता येईल व नव्या शैक्षणिक धोरणासही शाखा रहित शिक्षणाला वाव मिळु शकतो.भाषा विषय इंग्रजी,हिंदी,शारिरिक शिक्षण व ग्रंथालय शास्ञ या विषयाचेही एकञित मंथन झाल्यामुळे शैक्षणिक , सांस्कृतिक ,व सामाजिक विचारांचे आदान प्रदान होवु शकते.
निमंञित मार्गदर्शक राजस्थान बिकानेर येथील माजी व श्रीवास्तव,डॉ.जी.एन.शर्मा,डॉ.संदेश वाघ यांचे संशोधनपर व्याख्यान झाले.
डॉ.जयेंद्र जुनघरे (मुंबई),शहिला सखाला(चाळीसगांव), डॉ.एस.व्ही.धनवटे(नाशिक),डॉ.बी.जे.हिरवे(केज),डॉ.राजेश जाधव(माहिम), डॉ.रश्मी शर्मा (अजमेर),डॉ.ज्योती भाबळ(मुंबई),डॉ.वर्षा वर्मा (पुणे),डॉ.रामेश्वर पवार (परभणी),डॉ.मणिश जाधर (पुणे),डॉ.सयाम छाया (मुंबई),डॉ.अनिल लहाने (औरंगाबाद ),डॉ.दुर्गा मुरारी (मुंबई),प्राचार्य डॉ.चंद्रकांत मंडलिक,( अहमद नगर),डॉ.दिव्या जोशी (बिकानेर,राजस्थान)कौस्तुभ माळी (कल्याण),डॉ.विनया पवार (अहमद नगर) डॉ.वनिता काळे (अमरावती) यांनी आपल्या शोध निबंधांचे वाचन केले.
ही परिषद यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष व कार्यवाह डॉ व्ही,पी.माळी (कल्याण,मुंबई),संयोजक डॉ.संदेश वाघ, (मुंबई)डॉ.सुभाष चव्हाण (मुंबई),सह संयोजक डॉ.साहेबराव धनवटे(नाशिक),सह सचिव प्राचार्य डॉ.चंद्रकांत मंडलिक (अहमद नगर), श्री.प्रथमेश कुलकर्णी (पुणे)
यांनी विशेष परिश्रम घेतले.

