shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दत्तात्रय भरणे माझ्यासाठी दैवतच - निखिल घाडगे

दत्तात्रय भरणे माझ्यासाठी दैवतच - निखिल घाडगे

निखिल घाडगे याने भरणेवाडी येथे जाऊन दत्तात्रय भरणे यांना भेटून त्यांचे  सत्कार करून  मानले आभार.     
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी येथील निखिल सुरेश घाडगे हा एक वर्षापूर्वी खुब्याच्या आजाराने त्रस्त होता. त्याची आर्थिक परिस्थिती ही खूप नाजूक होती. याबाबत माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना समजले तेव्हा त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता त्याला मुंबई येथील हिरानंदनी हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार करून दिले.

निखिल घाडगे याच्या हॉस्पिटल उपचारानंतर दत्तात्रय भरणे यांनी त्याच्या तब्येतीची विचारपूस घरी जाऊन केली होती. यावेळी निखिल म्हणाला होता की ज्या दिवशी मी बरा होईल त्या दिवशी  मी तुमची भेट घ्यायला भरणेवाडी येथे येईल.

आज दिनांक ६ नोव्हेंबर रोजी निखिल घाडगे याने भरणेवाडी येथे जाऊन दत्तात्रय भरणे यांना भेटून त्यांचे आभार मानले व  सत्कार केला. 

निखिल घाडगे हा दत्तात्रय भरणे यांचे आभार व्यक्त करताना म्हणाला की, तरुणांना हातात दगड देऊन विद्रोही बनवायला भरपूर जण येतील पण त्याच हाताला काम किंवा (दवाखाना) आरोग्याच्या वेळी कामी आलेले दत्तात्रय मामा भरणे हे माझ्यासाठी दैवत आहेत. 

यावेळी नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, छत्रपती कारखान्याचे संचालक रणजीत निंबाळकर, सपकळवाडीचे सरपंच तानाजी सोनवणे,  शिवाजी सपकळ, धनंजय सपकळ, दत्तात्रय निंबाळकर, शुभम निंबाळकर, योगेश सपकळ, गौतम घाडगे, अक्षय घाडगे, सुनील सपकळ, तुषार सपकळ, शैलेश सपकळ, संजय वाघमारे, हनुमंत वाघमारे, केशव अभंगराव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
close