बैठकीत बाधितांचा जन आक्रोश-न्यायालयीन लढा व आत्मक्लेश सारखे मोठे आंदोलन करण्याचा इशारा..!!
सध्या महाराष्ट्रात चर्चेमध्ये असलेल्या विषय व शासनाकडून गायरान जमिनीवरील निवासी बाधित कुटुंबीयांना देण्यात आलेल्या नोटिसा यामुळे सर्वांमध्ये भीतीचे, घबराटीचे दुःखदायक, संतापाचे वातावरण, आहे.खेड तालुक्यातील येलवाडी गावातील सर्वाधिक म्हणजे ३४० कुटुंब बाधित असून त्यांनाअतिक्रमण संदर्भात नोटीस प्राप्त होत आहे. ही कुटुंबे गेली ३०-३५ वर्षापासून या ठिकाणी स्थायिक आहेत. मोठा खर्च करून येथील कुटुंबीयांनी कायमस्वरूपी घरे बांधले आहेत. बऱ्याचश्या घरांच्या नोंदी झालेले आहेत. घरपट्टी वेळेत भरली जाते. असे असताना नोटीसा प्राप्त झाल्यामुळे अडाणी, अज्ञानी, गरीब, कुटुंबीयांनी एकत्र येऊन "आम आदमी शेतकरी" संघटनेच्या माध्यमातून या प्रश्नसंदर्भात चर्चा व पुढील नियोजना संदर्भातबैठक रविवार दिनांक २७/११/२०२२ रोजी सायंकाळी ७:०० ते ९:०० वेळा घेतली.
या बैठकीसाठी मार्गदर्शक म्हणून खेड तालुका आम आदमी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. भर त पवळे, खेड तालुका आम आदमी युवा अध्यक्ष मा. मयूर दौंडकर, आम आदमी शेतकरी संघटना उपाध्यक्ष मा. दत्ताभाऊ टाकळकर,प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे, हे उपस्थित होते. या बैठकीसाठी ग्रामस्थांमधून मा. चेतन बोत्रे (मा वि. का. सोसायटी चेअरमन) मा. सागर गाडे (ग्रामपंचायत सदस्य) मा रामभाऊ गाडे, मा. सुरज पडवळ, पारूबाई गाडे,यांच्यासह शेतकरी, महिला, वृद्ध व्यक्ती, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आपल्या तीव्र संतापाच्या आणि अतिशय दुःखाच्या भावना व्यक्त केल्या.या भावना व्यक्त करताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते .
बैठकीमध्ये सर्वप्रथम नोटिसांना हरकती सर्वांच्या वतीने नोंदविण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी निवेदन तयार करून सर्वांच्या सह्या घेऊन तहसील कार्यालयात देण्याचे ठरले. व त्या निवेदनात आंदोलनाचा इशाराही देण्याचे ठरविण्यात आले. यापुढे एकजुटीने सर्व बाधितांनी न्यायालयीन पातळीवर व आंदोलनाच्या मार्गाने लढा देऊन आपला न्याय हक्क मिळेपर्यंत लढा चालू ठेवायचा असा निर्धार करण्यात आला.
बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना मा.भरत पवळे म्हणाले"येलवाडीच्या बाधित कुटुंबीयां बरोबर आम्ही सर्वजण असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा चालू ठेवू! तालुक्यातील सर्व बाधित कुटुंबीयांना एकत्र करून सर्वांच्या एकजुटीने ,आंदोलनाच्या व न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून प्रश्नाला न्याय देऊ!"
बैठकीच्या शेवटी सर्वांनी एकत्रित लढा देण्याबाबत शपथ घेतली.
"घर आमच्या हक्काचे! नाही कुणाच्या बापाचे..!"
"शेतकरी एकजुटीचा! विजय असो..!"
"हम सब! एक है..!"
यासारख्या घोषणा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: मा. सागर गाडे यांनी केले.आभार: मा. चेतन बोत्रे यांनी मानले.
बैठकीसाठी महिलांची, तरुणांची, वृद्धांची, उपस्थिती लक्षणीय होती.

