shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी परिसरातील विविध अवैध धंदे बंद करावे , सामुहिक अत्याचार प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई व्हावी - शिर्डी ग्रामस्थांचे पोलीसांना निवेदन..

राजेंद्र बनकर - शिर्डी 
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थस्थळ आहे अशा ठिकाणी अवैध व्यवसाय होत असुन पाकीटमारी , धुमस्टाईल चोरी , दुचाकी चोरी, नशा करुन साहित्य विकणे अशा अनेक घटनामुळे शहराची बदनामी होत आहे यामुळे कायद्याचे जे उल्लंघन करतील त्यांच्यावर शिर्डी पोलिसांनी कठोर कारवाई करावी याचबरोबर काही दिवसापुर्वी नगर येथील सेवाभावी संस्थेत राहत असलेल्या परंतु शिर्डी येथे आल्यावर या तरुणीवर परराज्यातील तरुणांनी सामूहिक बलात्कार करण्याचा प्रकार घडला. या गुन्ह्यात चार आरोपीना पकडण्यात आले.

यातील तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे तर एक बालसुधारगृहात आहे.या कारवाईने समाधान जरी व्यक्त होत असेल तरीही शिर्डी शहरात केवळ लॉजमध्ये आधारकार्ड व इतर पुरावा घेतला नाही म्हणून मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल केले जात असतांना ज्या हॉटेल मध्ये सामूहिक अत्याचाराची घटना घडली त्या हॉटेल चालक मालकावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही.

यामागे काय कारणे आहेत.कारण राहाता येथील घटनेत एक न्याय व शिर्डी येथील प्रकरणात दुजाभाव का असा संभ्रम शिर्डीकरांचा झाला असुन या पिडितेला कितपत  न्याय मिळेल याबाबत शाशंकता असुन या संपूर्ण प्रकरणाची बारकाईने तपास करुन जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे.

शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने शिर्डी पो.स्टेशन चे पो.निरिक्षक गुलाबराव पाटील यांना हे निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर नगरसेवक सुरेश आरणे , गोविंद कोते , सचिन खैरनार , विकास पगारे , गणेश पगारे , सोमनाथ जाधव , ज्ञानेश्वर हातांगळे , अन्सार शेख , शिवाजी भोंडगे , शाकीर इनामदार , अलीम तांबोळी , नशीर काद्री , साहिल म्हस्के , सचिन चौगुले आदीची नावे आहेत.

close