shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर मध्ये भरपूर डॉक्टरांनी नोकरी सोडली त्यामुळे आरोग्य सेवेला धक्का बसला - पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद.

इंदापूर मध्ये भरपूर डॉक्टरांनी नोकरी सोडली त्यामुळे आरोग्य सेवेला धक्का बसला -  पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद.                     इंदापूर प्रतिनिधी: आपल्याकडे इंदापूर मध्ये भरपूर डॉक्टरांनी नोकरी सोडली आहे. त्यामुळे आरोग्य सेवेला धक्का बसलेला आहे. परंतु इंदापूर मध्ये आकड्याची सुधारणा झालेली आहे. मागील दहा पंधरा वर्षांपूर्वीचे पाहिले तर आता आकड्यांमध्ये आरोग्य मध्ये सुधारणा  झालेली आहे. परंतु ज्या तुलनेने सुधारण्याची गरज आहे त्या तुलनेने अजून सुधारणा होण्याची  गरज आहे .मला खात्री आहे की , तालुका अधिकारी त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतील  असे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी   इंदापूर पंचायत समिती येथील अल्पबचत सभागृहात जिल्हा कृषी अधिकारी देशमुख, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना  सांगितले.                        
दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी इंदापूर तालुक्यातील भिगवन पासून ते इंदापूर पर्यंत विविध गावातील लाभधारकांना व उपक्रमांना भेटी दिल्या. यानंतर सायंकाळी इंदापूर पंचायत समिती येथील अल्पबचत सभागृहात पंचायत समितीचे अधिकारी व विभाग प्रमुख यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना आयुष प्रसाद म्हणाले की, इंदापूर तालुक्याचा अभिमान वाटतो की इंदापूर मध्ये फार चांगले काम चालू आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचा पण वाट आहे. आज जिल्हा परिषदेच्या लाभार्थींना भेटी देण्यासाठी आलो आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की.  इंदापूर तालुक्यात कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज ते म्हणजे गायरान जागेची मागणी आहे. काही शेती महामंडळामध्ये घरकुल लाभार्थी यांची जागेची मागणी आहे. त्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यायची आहे. बाकी पुढाकार घेतला आहे माझ्याकडून माझ्या कार्यालयाकडून प्रकल्प संचालक कडून पाठपुरावा आहे. परंतु ज्या पद्धतीने मान्यता व्हायला पाहिजे ते मान्यता होत नाही .           
मोजणी संदर्भात मोजणी अधिकारी यांना विनंती केली आहे ताबडतोब घरकुल लाभार्थी, घनकचरा प्रकल्पासाठी मोजणी करून द्यावा तेथे आपला प्रयत्न चालू आहे .                             
आपल्याकडे बालमृत्यूमध्ये सुधारणा केली असून सहा महिन्यांमध्ये  ८६ बालमृत्यू झाले. त्यामध्ये १३ बालमृत्यूचे प्रमाण इंदापूर तालुक्यामध्ये झाले आहे.  त्यामध्ये पळसदेव आरोग्य केंद्र क्षेत्रात ८ बालमृत्यू झाले आहेत. मुख्य अडचण अशी आहे की काही ठिकाणची लोक आरोग्य केंद्राकडे येण्यास घाबरतात त्याबद्दल अभ्यास करून आदेश काढलेले आहेत.                यामध्ये ऊसतोड कामगार आणि सतत भटकंती करणारे लोक त्यांच्यापर्यंत आपल्या आरोग्य यंत्रणा गेली पाहिजे. ऊसतोड कामगार आणि आशा वर्कर यांचा संबंध येत नाही त्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकत नाही. त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.                                आपल्याकडे एक चांगली गोष्ट झाली की, लहान मुलांची तपासणी केली त्यामध्ये ९० टक्के   मुलांमध्ये आरोग्य सुधारणा झाली त्याबद्दल महिला बालकल्याण विभाग आरोग्य विभागाचे अभिनंदन करतो .                          इंदापूरच्या इतिहासात शंभर टक्के ग्रामपंचायत कार्यालय होणार तसेच अंगणवाडी चे बांधकाम पूर्ण होतील.इंदापूर मध्ये  शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रात पद रिक्त आहेत बाकी काही अडचणी आहेत तसेच शिक्षण क्षेत्रात अजून प्रभावी कार्यक्रम करण्याची गरज आहे. त्या बाबतीत सूचना दिली आहेत .                               
इंदापुरात एक विषय गंभीर वाटतो ते म्हणजे रोजगार हमीतील साडेसहा हजार कामे अर्धवट पूर्ण आहेत. जिल्ह्यात कोठेच एवढी मोठी संख्या नाही .गट विकास अधिकारी यांना सांगितले आहे की ती कामे  पूर्ण करावे.    इंदापुरात रस्त्याची कामे फार झाली आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील खर्च तेरावा, चौदावा, पंधरावा वित्त आयोग तुलना केली असता आज ज्या संख्येने खर्च झाला आहे आजपर्यंतच्या इतिहासात एवढा खर्च झाला नव्हता.तुम्ही जो कर भरता त्यामधून आपण योजना राबवतो .हे लाभार्थी पर्यंत पोहोचले पाहिजे. लोकांना त्याचा लाभ भेटला पाहिजे. प्रत्येकाची सुधारणा व्हायला पाहिजे. इंदापूर मध्ये फार सुधारणा झाली.गटविकास अधिकारी पूर्ण स्टाफचे मी अभिनंदन करतो
close