shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे राजेंद्र सर्जेराव रणमोडे सर यांना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय हिंदी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मान.

लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे  राजेंद्र सर्जेराव रणमोडे सर यांना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय हिंदी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.मंत्री  हर्षवर्धन पाटील  यांच्या हस्ते सन्मान. 
इंदापूर प्रतिनिधी:१ नोव्हेंबर २०२२ रोजी काठमांडू या ठिकाणी झालेल्या नेपाळ भारत हिंदी शिक्षक एवं साहित्यकार संमेलनात  राजेंद्र सर्जेराव रणमोडे यांना हिंदी आंतरराष्ट्रीय भाषा पुरस्कार मिळाल्याबद्दल  मा.मंत्री  हर्षवर्धन पाटील  यांच्या हस्ते  रणमोडे सर यांना नंदिकेश्वर विद्यालय जंक्शन येथे सन्मानित करण्यात आले .           
यावेळी  उपसभापती  हेमंत नरोटे कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक  भूषण काळे, राहुल जाधव, माजी सभापती  नंदकुमार सोनवणे,  बाळासाहेब पाटील,  निवृत्ती गायकवाड , बाबा महाराज खारतोडे, बाळासाहेब पोळ, नंदिकेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  वसंत मोहोळकर ,जंक्शनचे सरपंच  रोहित मोहोळकर,  इंदापूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष  गणेश घोरपडे सर तसेच केंद्रीय समन्वयक  उस्मान मुलानी , नंदिकेश्वर विद्यालय जंक्शन चे प्राचार्य  चंद्रकांत सोळसे सर ,नंदिकेश्वर विद्यालय निरवांगी चे सुधाकर भोंग सर ,  कदम सर , शिंदे सर , सोलणकर सर , कुंभार सर व सर्व हिंदी प्रेमी अध्यापक उपस्थित होते.
close